चेंबूरमधून सर्वाधिक मुले ठरली शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:06 AM2021-03-24T04:06:38+5:302021-03-24T04:06:38+5:30

सीमा महांगडे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत झालेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेमध्ये १२ विभागात दहा हजारांहून अधिक मुले शाळाबाह्य ...

Most of the children from Chembur were out of school | चेंबूरमधून सर्वाधिक मुले ठरली शाळाबाह्य

चेंबूरमधून सर्वाधिक मुले ठरली शाळाबाह्य

Next

सीमा महांगडे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत झालेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेमध्ये १२ विभागात दहा हजारांहून अधिक मुले शाळाबाह्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये पालिका शिक्षण विभागातील १२ विभागांमध्ये कांदिवली, बोरिवली, गोरेगाव, अंधेरी, सांताक्रुझ, भांडुप, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, परेल, दादर, भायखळा यांचा समावेश होतो. यामध्ये स्थलांतरामुळे शाळाबाह्य झालेली मुले सर्वाधिक आहेत. त्यांची संख्या ९,९९५ आहे. यामध्ये सर्वाधिक शाळाबाह्य मुले ही चेंबूर परिसरातील असून, त्यांची संख्या १,४७५ आहे.

चेंबूर परिसरातील शाळाबाह्य मुलांमध्ये ७ मुले ही कधीच शाळेत गेलेली नाहीत, तर १,४६८ मुले ही अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य ठरली आहेत. यामध्ये ७५५ मुलगे, तर ७१३ मुली आहेत. अंधेरी परिसरात ६ मुले ही कधीच शाळेमध्ये गेली नसून १०३६ मुले ही अनियमित असल्याची माहिती आहे. यामध्ये ५३८ मुलगे व ४९८ मुली आहेत.

राज्याबाहेर तब्बल ७,९८५ मुले स्थलांतरित झाली आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार, तामिळनाडू, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, हरियाणा, तेलंगणा, आसाम या राज्यांचा समावेश आहे. यामध्ये राज्याबाहेर स्थलांतरित झालेल्या मुलांमध्येही चेंबूरमधून सर्वाधिक मुले स्थलांतरित झाली असून, यामध्ये मुलांची संख्या ६०४, तर मुलींची संख्या ५७० असून, एकूण १,१७४ मुले स्थलांतरित झाली आहेत. याशिवाय बोरिवली ७६५, कांदिवली ५८१, गोरेगाव ५८१, अंधेरी ८२८, सांताक्रूझ ५३०, भांडुप ६४३, घाटकोपर ४२१, कुर्ला ७७५, परेल ६५६, दादर ५३६, तर भायखळा ५८४ मुले राज्याबाहेर स्थलांतरित झाली आहेत.

शाळाबाह्यमध्ये मुलींचे प्रमाण अधिक

पालिका शिक्षण विभागाने दिलेल्या ९ हजार शाळाबाह्य मुलांच्या आकडेवारीमध्ये अनियमित मुलांची संख्या ५,१८८, तर मुलींची संख्या ४,८०७ आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कधीच शाळेत न गेलेल्या मुलांमध्ये मुलींची संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे. कधीच शाळेत न गेलेल्या १८२ मुलांमध्ये मुलींची संख्या ९५, तर मुलांची संख्या ८७ आहे. भायखळामध्ये कधीच शाळेत न गेलेल्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक असून, मुलांची संख्या २२, तर मुलींची संख्या २७ आहे. त्यानंतर घाटकोपर, भांडुप येथे अनुक्रमे ३५ व २७ मुले कधीच शाळेत गेलेली नाहीत. त्यातही मुलींची संख्या अनुक्रमे १९ व १४ असल्याचे समोर आले आहे..

......

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात उपसंचालक कार्यालयांतर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमेत यामध्ये सर्व अनुदानित शाळांच्या ४ ते ५ शिक्षकांचा समावेश होता. तर पालिका शिक्षण विभागामार्फत अनेक शाळांतील प्रत्येकी १ ते २ शिक्षकांनी सहभाग नोंदविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

चौकट

तालुक्याचे नाव - मुलगे - मुली - एकूण शाळाबाह्य मुले -

बोरिवली - ३२३-२९३- ६१६

कांदिवली - ५१५-४६५- ९८०

गोरेगाव- ३८६- ३४३- ७२९

अंधेरी - ५३९- ५०३- १०४२

सांताक्रूझ- ३४३- ३२५- ६६८

भांडुप - ४३१- ४०१- ८३२

घाटकोपर - २८७- २७६- ५६३

चेंबूर - ७५७- ७१८- १४७५

कुर्ला - ५०८- ४६२- ९७०

परेल- ४३५- ३९८- ८३३

दादर -३६१- ३२८- ६८९

भायखळा - ३९०- ३९०- ७८०

एकूण - ५२७५- ४९०२- १०१७७

Web Title: Most of the children from Chembur were out of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.