Join us

तलासरीत प्लॅस्टीक पिशव्यांचा सर्रास वापर

By admin | Published: March 15, 2015 10:42 PM

बाजारात व्यापाऱ्यांनी प्लॅस्टीक पिशव्या वापरू नयेत तसेच फिरत्या आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांनीही त्या वापरू नयेत. व्यापाऱ्यांनी

तलासरी : बाजारात व्यापाऱ्यांनी प्लॅस्टीक पिशव्या वापरू नयेत तसेच फिरत्या आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांनीही त्या वापरू नयेत. व्यापाऱ्यांनी त्याचा वापर केल्यास त्यांच्यावर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तलासरी ग्रामपंचायतीने दिला तसेच नोटीसाही बजावल्या.या नोटीसांना व कारवाईच्या इशाऱ्याला भीक न घालता प्लॅस्टीक पिशव्याचा वापर सर्रास सुरू ठेवल्याने तलासरीत जागजागी कचऱ्याचे ढिगारे जमा होऊ लागले आहेत.प्लॅस्टीकच्या पिशव्या नाक्यावरील नाल्यात साठून पावसाळ्यात पुराचे पाणी बाजारपेठेत घुसते. त्यामुळे नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच प्लॅस्टीक पिशव्यामधून टाकलेले पदार्थ जनावरे खात असल्याने तिही मृत्यूमुखी पडत आहेत. तलासरी ग्रामपंचायतीने गावातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी ठेवलेली असतानांही कचऱ्याचे ढिग जागोजागी दिसून येत आहेत. (वार्ताहर)