Join us

पोलिसांचे सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने; हृदयविकाराचे १५० बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 1:51 PM

मुंबई पोलिस दलात ३० टक्के मनुष्यबळ कमी, हृदयविकाराचे १५० बळी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस दलामध्ये मंजूर पदांपेक्षा ३० टक्के संख्याबळ कमी असल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. मुंबई पोलिस दलात सध्या ५२ हजार संख्याबळ आहे, त्या तुलनेत जुलैपर्यंत मुंबई पोलिस दलात केवळ ३६ हजार ४२५ पोलिस कार्यरत आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवरील ताण वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत ७७३ पोलिसांचा विविध आजारांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये हृदयविकाराने सर्वाधिक १५० पोलिसांचा बळी गेला आहे. 

‘मुंबईतील पोलिस यंत्रणा आणि कायदा व सुव्यवस्थेची सद्य:स्थिती २०२३’ हा प्रजा फाउंडेशनचा अहवाल गुरुवारी प्रकाशित झाला. सध्या मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत, शिवाय नोंदणीकृत गुन्ह्यांमध्ये मोठी वाढही होत असून, या चिंताजनक परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रजा फाउंडेशनच्या संशोधन व विश्लेषण विभागाचे प्रमुख योगेश मिश्रा यांनी सांगितले. 

बलात्कार आणि विनयभंग गुन्ह्यांत वाढ  गेल्या १० वर्षांत, म्हणजे २०१२  ते २०२२ या दरम्यान, बलात्कार आणि विनयभंगाच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे १३० टक्के व १०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.   बलात्काराचे गुन्हे या काळात ३९१ वरून ९०१ वर पोहोचले आहेत, तर विनयभंगाचे गुन्हे या कालावधीत ११३७ वरून २३२९ एवढे वाढले आहेत.   दाखल झालेल्या एकूण बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी ६३ टक्के (६१५) गुन्हे अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे आहेत. या प्रकरणांमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.   २०२२ च्या अखेरीस पोक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ७३ टक्के गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.

मृत्यूचे कारण    २०१८    २०१९    २०२०    २०२१    २०२२ कोविड १९    -     -    १००    २४     - कावीळ/यकृत    ०९    २२    १३    ११     ०६ कर्करोग    १५    १३    ११    ११    ०६ अपघाती मृत्यू    ०९    ०७    १०    ०९    ०६ मूत्रपिंड    ०२    ०४    ०८    ११    ११ आत्महत्या    ०७    ०३    ०४    ०८    ०७ मधुमेह    ०६    ०४    ०३    ०५    ०४ क्षयरोग    ०५    ०६    ०२    १०    ०१ एचआयव्ही    -    -    -        ०२    ०१अन्य आजार    ५०    ६५    ६३    ३२    ११ एकूण    १२९    १४४    २३०    १५६     ११४

महत्त्वाच्या पदांमध्येही २२% संख्याबळ कमीमुंबई पोलिस दलात ३० टक्के मनुष्यबळाची कमतरता असून तपास करणारे पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक अशा महत्त्वाच्या पदांमध्येही २२ टक्के संख्याबळ कमी आहे. ताण वाढून विविध आजारांना  तोंड द्यावे लागले आहे.  गेल्या पाच वर्षांत हृदयविकाराने १५०, कोरोनामुळे १२४ तर कावीळ, यकृताच्या आजाराने ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकार मृत्यूचे प्रमाण १०४ टक्क्यांनी वाढले आहे. २९ जणांनी विविध कारणातून आयुष्य संपविले आहे. 

टॅग्स :मुंबईपोलिसहृदयविकाराचा झटका