सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद उत्तर मध्य मुंबईत
By admin | Published: November 26, 2014 12:54 AM2014-11-26T00:54:32+5:302014-11-26T00:54:32+5:30
मुंबईतील सहा लोकसभा मतदारासंघांमधील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद ही उत्तर मध्य मुंबईत झाल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाऊंडेशनने समोर आणली आहे.
Next
प्रजा फाऊंडेशनची श्वेतपत्रिका
मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारासंघांमधील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद ही उत्तर मध्य मुंबईत झाल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाऊंडेशनने समोर आणली आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत उत्तर मध्य मुंबईत गेल्या पाच वर्षात एकूण 37 हजार 371 गुन्ह्यांची नोंद केल्याचे प्रजाचे व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
खून, बलात्कार, दंगल, घरफोडी, सोनसाखळी चोरी, चोरी व वाहनचोरी या घटनांत यावर्षी उत्तर मुंबईत एकूण 8 हजार 279 गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यात सर्वाधिक घरफोडीच्या 734, चोरीच्या 1 हजार 598 आणि वाहन चोरीच्या 819 गुन्ह्यांचा समावेश आहे. याउलट गेल्या पाच वर्षात येथील आमदार असलेल्या कृष्णकुमार हेगडे, मिलींद कांबळे, प्रकाश सावंत, बाळा सिद्दीकी, कृपाशंकर सिंह या पाचही आमदारांनी विधानसभेत गुन्ह्यांसंबंधात केवळ 341 प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रश्नांची ही संख्या मुंबईतील इतर लोकसभा मतदारसंघांतील आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. गेल्या पाच वर्षात मुंबईतील सहा विभागांत मोडणा:या उत्तर मुंबईत 24 हजार 357, उत्तर पश्चिम मुंबईत 3क् हजार 147, उत्तर पूर्व मुंबई 22 हजार 133, दक्षिण मध्य मुंबईत 3क् हजार 82क्, दक्षिण मुंबईत 31 हजार 834 आणि सर्वाधिक उत्तर मध्य मुंबईत 37 हजार 371 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांची 11 टक्के पदे रिक्त!
एकीकडे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना मुंबईतील 11 टक्के पोलिसांची पदे रिक्त आहेत. जुलै 2क्14 र्पयत मुंबईला 41 हजार 643 पोलिसांची पदे मंजूर करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात 37 हजार 159 पदेच भरलेली आहेत. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या अधिका:यांची 32 टक्के पदे रिक्त आहेत. (प्रतिनिधी)
महिलासंदर्भातील
गुन्ह्यात वाढ
प्रजाने काढलेल्या श्वेतपत्रिकेत सोनसाखळी चोरी, विनयभंग व अत्याचार या महिलासंदर्भातील गुन्ह्यांत मोठय़ा संख्येने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एप्रिल 2क्13 ते मार्च 2क्14 दरम्यान मुंबईत महिला अत्याचाराचे 432, विनयभंगाचे 1 हजार 2क्9 आणि सोनसाखळी चोरीचे 2 हजार 11क् गुन्हे नोंेदवण्यात आले आहे. एप्रिल 2क्12 ते मार्च 2क्13 या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महिला अत्याचाराचे प्रमाण 47 टक्के, विनयभंगाचे प्रमाण 52 टक्के आणि सोनसाखळी चोरीचे प्रमाण 66 टक्क्यांने वाढल्याचे निदर्शनास येते.
सर्वाधिक रेल्वे अपघाती मृत्यू कुल्र्यात!
गेल्यावर्षी रेल्वे अपघातात एकूण 1 हजार 854 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. त्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू हे कुर्ला रेल्वे स्थानकाच्या हद्दीत झाले आहेत. तर बोरीवली आणि कुर्ला रेल्वे स्थानकांच्या हद्दीत एकूण अपघाती मृत्यूंच्या 42 टक्के इतक्या अपघाती मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. कुल्र्यात 444 आणि बोरिवलीत 345 अपघाती मृत्यू झाले आहेत.