गोरेगावच्या ‘बेस्ट रोड’वर सर्वाधिक धोकादायक झाडे
By admin | Published: September 3, 2016 02:04 AM2016-09-03T02:04:47+5:302016-09-03T02:04:47+5:30
गोरेगावच्या सुंदरनगर परिसरात झाड पडल्याने पराग पावसकर या अकाऊंटटचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जाग्या झालेल्या पालिकेने गोरेगावात सुमारे साडेचारशे झाडांची छाटणी
- गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई
गोरेगावच्या सुंदरनगर परिसरात झाड पडल्याने पराग पावसकर या अकाऊंटटचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जाग्या झालेल्या पालिकेने गोरेगावात सुमारे साडेचारशे झाडांची छाटणी केली असून, यात बस आणि अन्य खासगी गाड्यांची ये-जा असलेल्या ‘बेस्ट रोड’वर सर्वाधिक धोकादायक झाडे असल्याचे समोर आले आहे.
गोरेगावच्या सुंदर नगरमध्ये २९ जुलै रोजी कारवर झाड कोसळले. यात पावसकरांना जीव गमवावा लागला. गोरेगावमध्ये आरे रोड, विश्वेशवर रोड, सोनावाला रोड, प्रबोधन मार्ग, गणेश घाट, सुंदरनगर रोड, बेस्ट आणि आरे रोड परिसरात जुनी आणि धोकादायक झाडे असल्याची माहिती पालिकेला स्थानिकांनी केलेल्या तक्रारीवर मिळाली. त्यानुसार आॅगस्ट महिन्यात पालिकेने झाडांच्या छाटणीचे काम सुरू केले. या छाटणीवेळी अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या मोतीलाल नगरमधील बेस्ट रोड आणि आरे रोडवर सर्वाधिक धोकादायक झाडे असल्याचे समोर आले आहे.
आम्ही महिन्याभरात ४५७ धोकादायक झाडांची छाटणी केली आहे. बेस्ट मार्गावरील ७७ झाडांची छाटणी करण्यात आली आहे.
- एस.एस. धोंड, साहाय्यक आयुक्त, पी/दक्षिण