Join us

इतिहासातील सर्वांत लबाड सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 2:45 AM

फडणवीस यांचा हल्लाबोल; शेतकरी, वीज ग्राहकांना फसविले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आधी वीजजोडणी तोडण्याला स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी ती मागे घ्यायची, ही फारच मोठी लबाडी आहे. शेतकरी, सर्वसामान्यांची मोठी थट्टा आहे. ठाकरे सरकार हे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत लबाड सरकार आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अधिवेशन सुरू असताना विरोधकांच्या दबावात वीज कनेक्शन कापण्यास स्थगिती दिली आणि अधिवेशन संपता संपता ती उठविली. कोरोनाच्या संकटात सापडलेले सामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांना सरकारने धक्का दिला, असे फडणवीस म्हणाले. सचिन वाझे प्रकरणात तर सरकार पूर्णत: उघडे पडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या पत्रपरिषदेवरून आता हे स्पष्ट झाले आहे की, सचिन वाझे यांना आपल्या बचावासाठी कोणताही नवीन वकील शोधण्याची गरज नाही. ‘अ‍ॅड.’ म्हणून उद्धव ठाकरे त्यांच्या बचावासाठी येतील, हे स्पष्ट झाले, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊनच आणि स्थानिकांना रोजगारसंधी लक्षात घेऊन या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होतेया संपूर्ण अधिवेशनात सत्तारूढ पक्ष पूर्णपणे उघडा पडला. ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात या सरकारने जागा कमी केल्या. मराठा आरक्षणावर नुसता घोळ घातला जात आहे. त्यामुळे दोन्ही आरक्षण धोक्यात आहेत.  हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकले नाही. मुख्यमंत्री सभागृहाला गांभीर्याने घेत नाहीत हेही दिसले, अशी टीका त्यांनी केली.

प्रकल्पाला विरोध करण्याचेच शिवसेनेचे धोरण नाणार प्रकल्पासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊनच आणि स्थानिकांना रोजगारसंधी लक्षात घेऊन या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते. पण, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रकल्पाला प्रारंभी विरोध करण्याचेच धोरण शिवसेनेचे कायम राहिलेले आहे. आता राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रपरिषदेत शरद पवार यांचाही पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. आता तीन पक्षांचा पाठिंबा असताना या प्रकल्पाचा मार्ग मोकळा व्हावा, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीस