सर्वात महाग पेट्रोल-डिझेल मुंबईत, काँग्रेस छेडणार अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 05:51 AM2018-02-06T05:51:52+5:302018-02-06T05:55:24+5:30
देशभर इंधन दरवाढ झाली असली तरी मुंबईकरांना त्याचा ज्यादा भार सोसावा लागत आहे. देशातील सर्वांत महाग पेट्रोल आणि डिझेल मुंबईकर खरेदी करत असून याविरोधात १२ फेब्रुवारीला जनजागरण अभियान चालविण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.
मुंबई : देशभर इंधन दरवाढ झाली असली तरी मुंबईकरांना त्याचा ज्यादा भार सोसावा लागत आहे. देशातील सर्वांत महाग पेट्रोल आणि डिझेल मुंबईकर खरेदी करत असून याविरोधात १२ फेब्रुवारीला जनजागरण अभियान चालविण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.
मुंबईकरांनी शिवसेना-भाजपाला ६ खासदार, ३० आमदार आणि मुंबई महानगरपालिकेची सत्ता दिली. तरीही मुंबईकरांचीच लूट सुरू आहे. केंद्र सरकारचा कर, विविध सेस आणि पेट्रोल पंप चालकांचा नफा गृहीत धरला तरी पेट्रोल ५७.५५ आणि डिझेल ५४.६३ रुपये प्रति लीटर दराने मिळायला हवे. मात्र, महाराष्ट्र सरकारने एक्साइज ड्युटी, वॅट आणि सरचार्ज अशा विविध करांचा मारा केल्याने पेट्रोल ८१.१७ तर डिझेल ६८.२३ रुपयांवर गेले आहे.
>एक लीटर पेट्रोलमागे २३.६२ रुपये, डिझेलमागे १३.६० रुपयांचा अतिरिक्त कर मुंबईकरांना भरावा लागत आहे. पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणल्यास दोन्हीही ५०
रुपये प्रति लीटर दराने मिळू शकेल, असा दावा निरुपम यांनी केला आहे.
> पेट्रोल डिझेल
क्रूड आॅइल २६.४२ २६.४२
एन्ट्री टॅक्सनंतर ३१.१७ ३३.९२
शुद्धीकरणानंतरची किंमत ३४.४८ ३६.७९
डिलरची खरेदी किंमत ५३.९६ ५२.१२
(केंद्राच्या अतिरिक्त सीमा शुल्क, सेसनंतर)
पेट्रोल पंपमालकांच्या
कमिशननंतरचा दर ५७.५५ ५४.६३
(प्रति लीटर)