वरळी, प्रभादेवीत बेकायदा बांधकामे जोमात! पालिकेकडून २०५ कोटींचा दंड आकारला गेला, पण वसूल किती झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:42 IST2025-04-07T16:40:19+5:302025-04-07T16:42:22+5:30

मुंबई महानगरपालिकेनं सध्या शहर आणि उपनगरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.

most of Illegal constructions in Worli Prabhadevi bmc imposed a fine of Rs 205 crore but how much was recovered | वरळी, प्रभादेवीत बेकायदा बांधकामे जोमात! पालिकेकडून २०५ कोटींचा दंड आकारला गेला, पण वसूल किती झाला?

वरळी, प्रभादेवीत बेकायदा बांधकामे जोमात! पालिकेकडून २०५ कोटींचा दंड आकारला गेला, पण वसूल किती झाला?

मुंबई

मुंबई महानगरपालिकेनं सध्या शहर आणि उपनगरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. यात अनधिकृत बांधकामांना २०० टक्के दंड आकारण्यासोबतच बांधकामांच्या पाडकामाचाही समावेश आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील अनधिकृत इमल्यावर आतापर्यंत पालिकेनं एकूण ३९२.२८ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. यात सर्वाधिक अनधिकृत वाढीव बांधकामे ही वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, करी रोड भागात आढळली असून या ठिकाणी मालमत्ता विभागाने आतापर्यंत २०९ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. तर सर्वात कमी दंड फोर्ट, मरिन ड्राइव्ह, कुलाबा या विभागांत आकारण्यात आला आहे. 

मुंबई महापालिका अधिनियम १८८८ कलम १५२ (ए) नुसार अनधिकृत बांधकामांवर मालमत्ता कराच्या २०० टक्के दंड आकारणी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, पाडकामाची कारवाई करतानाच अनधिकृत बांधकामांना दंडाची नोटीस देणे, दंड आकारणीची कार्यवाही करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी रहिवास इमारतींतील घरे, बंगले किंवा दुकानांमध्ये अनधिकृत वाढीव बांधकाम केले आहे, अशा मालमत्ताधारकांवरही २०० टक्के दंडाची कारवाई केली जात आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालवाधीत एकूण तीन हजार ३४३ मालमत्तांना ३९२ कोटी २८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पण त्यापैकी केवळ १२ कोटी ३८ लाख रुपये इतक्याच दंडाची वसुली पालिकेला करता आली आहे. 

जप्त मालमत्तांचा लिलाव करणार
महापालिकेने अशा जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून सुरुवातीला मुंबईतील प्रत्येक वॉर्डातील एका थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. त्यासाठी भूखंड व इमारतींचे मूल्यांकन निश्चित करण्यासाठी पालिकेकडून शासनमान्य संस्थेची नियुक्तीही केली जाणार आहे. 

वॉर्ड>> दंड आकारणी>> वसुली
ए- ४ लाख- शून्य
बी- १ कोटी- शून्य
सी- ६० लाख- २० लाख
डी- २ कोटी २३ लाख- १३ लाख
ई- ३७ लाख- शून्य
एफ उत्तर- १६ लाख- १ लाख
एफ दक्षिण- ४३ लाख- १ लाख
जी उत्तर- २४ कोटी ४० लाख- १ कोटी १३ लाख
जी दक्षिण- २०९ कोटी- ३ कोटी २७ लाख
एच पूर्व- २ कोटी ८३ लाख- १५ लाख
एच पश्चिम- १०० कोटी ६८ लाख- ४ कोटी ६६ लाख
के पूर्व- १३ कोटी १३ लाख- ८९ लाख
के पश्चिम- ४ कोटी ४० लाख- ३३ लाख
पी उत्तर- ७३ लाख- शून्य
पी दक्षिण- १ कोटी २६ लाख- १९ लाख
आर मध्य- ७३ लाख- १ लाख
आर उत्तर- ७९ लाख- १५ लाख
आर दक्षिण- २ कोटी ४ लाख- १७ लाख
एल- १ कोटी ९ लाख- १० लाख
एम पूर्व- ५ लाख- शून्य
एम पश्चिम- ११ लाख- शून्य
एन- ५ कोटी २५ लाख- ४९ लाख
एस- १६ कोटी ८७ लाख- ५१ लाख
टी- ३ कोटी ९९ लाख- १५ लाख

Web Title: most of Illegal constructions in Worli Prabhadevi bmc imposed a fine of Rs 205 crore but how much was recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.