Join us

वरळी, प्रभादेवीत बेकायदा बांधकामे जोमात! पालिकेकडून २०५ कोटींचा दंड आकारला गेला, पण वसूल किती झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:42 IST

मुंबई महानगरपालिकेनं सध्या शहर आणि उपनगरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई

मुंबई महानगरपालिकेनं सध्या शहर आणि उपनगरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. यात अनधिकृत बांधकामांना २०० टक्के दंड आकारण्यासोबतच बांधकामांच्या पाडकामाचाही समावेश आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील अनधिकृत इमल्यावर आतापर्यंत पालिकेनं एकूण ३९२.२८ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. यात सर्वाधिक अनधिकृत वाढीव बांधकामे ही वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, करी रोड भागात आढळली असून या ठिकाणी मालमत्ता विभागाने आतापर्यंत २०९ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. तर सर्वात कमी दंड फोर्ट, मरिन ड्राइव्ह, कुलाबा या विभागांत आकारण्यात आला आहे. 

मुंबई महापालिका अधिनियम १८८८ कलम १५२ (ए) नुसार अनधिकृत बांधकामांवर मालमत्ता कराच्या २०० टक्के दंड आकारणी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, पाडकामाची कारवाई करतानाच अनधिकृत बांधकामांना दंडाची नोटीस देणे, दंड आकारणीची कार्यवाही करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी रहिवास इमारतींतील घरे, बंगले किंवा दुकानांमध्ये अनधिकृत वाढीव बांधकाम केले आहे, अशा मालमत्ताधारकांवरही २०० टक्के दंडाची कारवाई केली जात आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालवाधीत एकूण तीन हजार ३४३ मालमत्तांना ३९२ कोटी २८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पण त्यापैकी केवळ १२ कोटी ३८ लाख रुपये इतक्याच दंडाची वसुली पालिकेला करता आली आहे. 

जप्त मालमत्तांचा लिलाव करणारमहापालिकेने अशा जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून सुरुवातीला मुंबईतील प्रत्येक वॉर्डातील एका थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. त्यासाठी भूखंड व इमारतींचे मूल्यांकन निश्चित करण्यासाठी पालिकेकडून शासनमान्य संस्थेची नियुक्तीही केली जाणार आहे. 

वॉर्ड>> दंड आकारणी>> वसुलीए- ४ लाख- शून्यबी- १ कोटी- शून्यसी- ६० लाख- २० लाखडी- २ कोटी २३ लाख- १३ लाखई- ३७ लाख- शून्यएफ उत्तर- १६ लाख- १ लाखएफ दक्षिण- ४३ लाख- १ लाखजी उत्तर- २४ कोटी ४० लाख- १ कोटी १३ लाखजी दक्षिण- २०९ कोटी- ३ कोटी २७ लाखएच पूर्व- २ कोटी ८३ लाख- १५ लाखएच पश्चिम- १०० कोटी ६८ लाख- ४ कोटी ६६ लाखके पूर्व- १३ कोटी १३ लाख- ८९ लाखके पश्चिम- ४ कोटी ४० लाख- ३३ लाखपी उत्तर- ७३ लाख- शून्यपी दक्षिण- १ कोटी २६ लाख- १९ लाखआर मध्य- ७३ लाख- १ लाखआर उत्तर- ७९ लाख- १५ लाखआर दक्षिण- २ कोटी ४ लाख- १७ लाखएल- १ कोटी ९ लाख- १० लाखएम पूर्व- ५ लाख- शून्यएम पश्चिम- ११ लाख- शून्यएन- ५ कोटी २५ लाख- ४९ लाखएस- १६ कोटी ८७ लाख- ५१ लाखटी- ३ कोटी ९९ लाख- १५ लाख

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई