Join us  

सर्वाधिक मतदार पुण्यात बरं का; ५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:26 PM

चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार अधिक, ५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून, तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांत जास्त मतदार आहेत. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्ह्यांमध्ये पुरुष  मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

जिल्हा आणि मतदारसंख्या

    अहमदनगर    ३६,४७,२५२     सोलापूर    ३६,४७,१४१     जळगाव    ३५,२२,२८९     कोल्हापूर    ३१,७२,७९७    औरंगाबाद    ३०,४८,४४५

बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या १०  जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.

५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदारnअहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छ. संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत.nअर्थात अनेक जिल्हे असे आहेत, की ज्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत किंवा त्या जिल्ह्याचा काही भाग दुसऱ्या लोकसभा मतदारसंघाला जोडला गेला आहे. 

पुण्यात ८२ लाखांहून अधिक मतदारपुण्याची एकूण मतदारसंख्या ८२ लाख, ८२ हजार, ३६३ आहे. मुंबई उपनगरची एकूण मतदारसंख्या ७३ लाख, ५६ हजार, ५९६ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ६५ लाख, ७९ हजार, ५८८ आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ४८ लाख, ८४ हजार, ९९ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यातील  एकूण मतदारसंख्या ४२ लाख, ७२ हजार, ३६६ इतकी आहे.

चार जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. रत्नागिरीची एकूण मतदार संख्या १३ लाख ३ हजार, ९३९ असून, पुरुष  मतदार ६ लाख ३१ हजार १२, तर महिला मतदार ६ लाख, ७२ हजार, ९१६ इतकी आहे. ११ तृतीयपंथी आहेत.

नंदुरबारची एकूण मतदारसंख्या १२ लाख, ७६ हजार ९४१ इतकी  असून,  पुरुष मतदार ६ लाख, ३७ हजार ६०९ आहेत.  महिला मतदार ६ लाख ३९ हजार ३२० इतकी आहे. १२ तृतीयपंथी आहेत. गोंदिया जिल्ह्याची  एकूण मतदारसंख्या १० लाख, ९२ हजार, ५४६ असून, पुरुष मतदार ५ लाख ४१ हजार २७२ आहेत. महिला मतदारांची संख्या ५ लाख ५१ हजार २६४ इतकी आहे. 

सिंधुदुर्गची एकूण मतदारसंख्या ६ लाख, ६२ हजार, ७४५ असून, यामध्ये १ तृतीयपंथी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३ लाख ३० हजार, ७१९  आहे, तर महिला मतदार ३ लाख, ३२ हजार २५ आहेत.

 

टॅग्स :पुणेमतदानभारत