- कुलदीप घायवट मुंबई : रेल्वे प्रवासात विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिलांकडून दंड वसूल करण्यासाठी महिला तिकीट तपासनिसांची करडी नजर असते. मध्य रेल्वे मार्गावर पुरुषांसह महिलांची संख्या प्रचंड आहे. पुरुषांप्रमाणे अनेक महिला विनातिकीट प्रवास करतात. अशा विनातिकीट पुरुष आणि महिला प्रवाशांना चाप बसण्यासाठी महिलांचे विशेष पथक स्थानकावर असते. मागील २४ वर्षांपासून तिकीट तपासनीस विभागात काम करणाऱ्या शारदा विजय यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक दंड वसूल करून रेल्वेच्या तिजोरीत भर घातली आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शारदा यांना पुरस्कार देण्यात आला आहे.शारदा म्हणाल्या की, प्रत्येक लोकलमधून हजारो प्रवासी प्रवास करतात. यामधील विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांना हेरणे सुरुवातीला कठीण होते. सवयीनंतर विनातिकीट प्रवाशांना पकडणे सोयीचे झाले.(शारदा विजय, महिला तिकीट तपासनीस)
सर्वाधिक दंड वसुलीचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:20 AM