सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रातच - अर्थमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 06:33 AM2018-12-25T06:33:41+5:302018-12-25T06:34:05+5:30

आजही सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रात आहेत. निवडणुकीचे वर्ष असल्याने पृथ्वीराज चव्हाणसुद्धा विषय समजून न घेताच पत्रकार परिषदा घेत सुटले आहे.

 Most Start up Maharashtra - Finance Minister | सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रातच - अर्थमंत्री

सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रातच - अर्थमंत्री

Next

मुंबई : आजही सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रात आहेत. निवडणुकीचे वर्ष असल्याने पृथ्वीराज चव्हाणसुद्धा विषय समजून न घेताच पत्रकार परिषदा घेत सुटले आहे. मुख्यमंत्री पद भूषविलेल्या नेत्यांनी तरी किमान राज्याची बदनामी करू नये. पंतप्रधान कार्यालयात काम केलेल्या मंत्र्यांनी तरी अहवालातील सोयीचे तेवढे अर्थ काढायचे नसतात, अशा शब्दांत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे.
स्टार्टअप धोरण अंमलबजावणीत महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यानंतर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी पत्रकाद्वारे खुलासा केला. ज्या अहवालाचा आधार घेत चव्हाण यांनी आरोप केला, त्यात देशातील सर्वाधिक २,७८७ स्टार्ट अप महाराष्टÑात असल्याचे म्हटले आहे. आज देशातील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याने गुंतवणूकदारांच्या अपेक्षा राज्याकडून अधिक आहेत. त्यामुळे परसेप्शन इंडेक्समध्ये राज्याला ९३ टक्के गुण मिळाले. देशाचा औद्योगिक विकास दर ४.४ टक्के तर राज्यात ६.५ टक्के विकास दर असल्याचे ते म्हणाले.

Web Title:  Most Start up Maharashtra - Finance Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.