आई म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत, शरद पवारांचं मोदींना पत्र; मातोश्रींसाठी प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 02:33 PM2022-12-29T14:33:08+5:302022-12-29T14:34:29+5:30

शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रात, मोदींनी आईची भेट घेतल्याचं समजलं, असेही म्हटलं.

Mother is source of energy, Sharad Pawar's letter to Modi; Sangit Maya's intimacy | आई म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत, शरद पवारांचं मोदींना पत्र; मातोश्रींसाठी प्रार्थना

आई म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत, शरद पवारांचं मोदींना पत्र; मातोश्रींसाठी प्रार्थना

googlenewsNext

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन (वय ९९) आजारी पडल्याने त्यांना येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासाने सांगितले. आजारी आईला भेटण्यासाठी मोदी दुपारी रुग्णालयात पोहोचले. अहमदाबादला पोहोचल्यानंतर ते रुग्णालयात गेले आणि तेथे तासभराहून अधिक काळ थांबले. त्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून आईंच्या प्रकृतीबद्दल आणि लवकरच बरे होण्याबाबत प्रार्थना केली आहे. 

शरद पवारांनी पत्र लिहून मोदींनी आईची भेट घेतल्याचं समजलं, असेही म्हटलं. तसेच, तुमच्या मातोश्री या ऊर्जेचं मोठा स्त्रोत आहेत. आपण मातोश्रींच्या अतिशय जवळ आहात, तुमचं आईंशी असलेलं नातं मला व्यक्तीशा माहिती आहे. आपल्या जडणघडणीत त्यांचं मोठं योगदान आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले. तसेच, मोदींच्या आईंची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थनाही केली.  
दरम्यान, भाजप खासदार जुगलजी ठाकोर यांनी सांगितले की, हिराबेन यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळू शकतो. 

कठीण काळात तुमच्यासोबत : राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी आणि इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी बुधवारी मोदी यांच्या आईंना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी द्वीट केले की, “आई आणि मुलामधील प्रेम हे शाश्वत आणि अमूल्य आहे. मोदीजी, या कठीण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. तुमच्या मातोश्री लवकर बऱ्या व्हाव्यात.”
 

Web Title: Mother is source of energy, Sharad Pawar's letter to Modi; Sangit Maya's intimacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.