व्यसनाधीन मुलाचा घेतला आईने जीव : २४ तासांत तीन हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 06:12 AM2017-08-18T06:12:21+5:302017-08-18T06:12:26+5:30

भांडुप, मानखुर्द आणि धारावीत २४ तासांत तीन हत्यांच्या घटनेने बुधवारी खळबळ उडाली.

The mother took the addict's son: Three murders in 24 hours | व्यसनाधीन मुलाचा घेतला आईने जीव : २४ तासांत तीन हत्या

व्यसनाधीन मुलाचा घेतला आईने जीव : २४ तासांत तीन हत्या

googlenewsNext

मुंबई : भांडुप, मानखुर्द आणि धारावीत २४ तासांत तीन हत्यांच्या घटनेने बुधवारी खळबळ उडाली. मुलाच्या व्यसनाला कंटाळून आईने मुलाची हत्या केली तर घरभाडे थकविल्याच्या रागात भावाने भावाच्या छातीत कैची खुपसली. तिसºया घटनेत पूर्वीच्या भांडणाचा राग असल्याने १८ वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आली.
मानखुर्दच्या आंबेडकर चाळीत अन्वीराबानो इद्रीसी (४८) या सून आणि तीन मुलांसोबत राहतात. मोठा मुलगा नदिमचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला. त्याला दारू, अमलीपदार्थांचे व्यसन होते. त्यासाठी पैसे न दिल्यास तो घरच्यांना मारझोड करत असे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास उशिराने घरी आलेल्या नदिमने दारूच्या नशेत घरच्यांसोबत भांडण केले. त्यानंतर कुटुंबीयांना मारझोड सुरू केली. भावाने त्याला खाटेला बांधून ठेवले. त्यानंतर नेहमीप्रमाणे तो बाहेर झोपण्यासाठी निघून गेला. घरात अन्वीराबानो या नदिमसोबत एकट्याच होत्या. नदिमकडून आईला शिवीगाळ सुरू होती. याच रागाच्या भरात जवळील ओढणीने त्यांनी नदिमची गळा दाबून हत्या केली. शवविच्छेदन अहवालात त्याची हत्या झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कुटुंबीयांकडे चौकशी केली. तेव्हा आईने हत्येची कबुली दिली.
बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून भांडुपमधील आकाश दीपक वानखेडे (१८) याच्या हत्येची घटना समोर आली. धारदार शस्त्राने दोन अल्पवयीन तरुणांनी त्याची हत्या केल्याचे तपासात समोर आले. भांडुप पोलिसांनी दीपक तायडे (१८) या तरुणाला अटक केली. या घटनांपाठोपाठ धारावी परिसरात आणखी एका हत्येच्या घटनेने मुंबई हादरली. धारावीतील चमडा बाजार परिसरात राहत असलेल्या हैदर कामरुद्दिन आलम (३८)च्या छातीमध्ये कैची खुपसून लहान भाऊ अन्सार (२८) याने हत्या केली.

Web Title: The mother took the addict's son: Three murders in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.