Join us  

कुपोषण रोखण्यासाठी मातांना ‘दशपदी’

By admin | Published: July 28, 2014 11:37 PM

ठाणे जिल्ह्यातील हा ग्रामीण तालुका कुपोषणाबाबत ग्रासलेला असताना नागरिकांत जनजागृती करण्यासाठी खास सासू - सून मेळावा आयोजित करण्यात आला होता

विक्रमगड : ठाणे जिल्ह्यातील हा ग्रामीण तालुका कुपोषणाबाबत ग्रासलेला असताना नागरिकांत जनजागृती करण्यासाठी खास सासू - सून मेळावा आयोजित करण्यात आला होता. बालकाच्या कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासोबतच उदरात बाळाचे पोषण होण्यासाठी तसेच स्त्रीभू्रण हत्या वाचविण्यासाठी अंधश्रध्देपासून दूर ठेवण्यासाठी हा सासू - सून मेळावा भरवल्याची माहिती मुख्यसेविका संजीवनी घरत यांनी दिली. सॅम व मॅन यांची संख्या अल्प झाली असून गरोदर व स्तनदा माता सासू - सुनांना मार्गदर्शन केले जात आहे. या कार्यक्रमात गरोदर स्तनदा मातांना दशपदी वाटप केले.