Mother's Day 2020: आईची 'ती' गोष्टच राज्याचा आर्थिक भार सांभाळताना कामी आली- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 12:14 PM2020-05-10T12:14:40+5:302020-05-10T12:31:47+5:30
आज वर्ल्ड मदर्स डे आहे. तशी रोजच आईची आठवण येते, मात्र आजचा दिवस स्पेशल आहे म्हणून आपल्याशी आईच्या काही आठवणी शेअर करतोय...
मुंबईः आईचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, यातूनही आईची महती विषद होते. असं म्हणतात, आई म्हणजे ममता,आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई. आज मातृ दिवस असल्यानं अनेक नेते आणि कलाकार आईंच्या आठवणी जागवतात. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या जयंत पाटलांनीही मातृदिनाच्या निमित्तानं आईंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. फेसबुक पोस्ट करत त्यांनी आईच्या आठवणींना वाट मोकळी करून दिली आहे. ते लिहितात, आज वर्ल्ड मदर्स डे आहे. तशी रोजच आईची आठवण येते, मात्र आजचा दिवस स्पेशल आहे म्हणून आपल्याशी आईच्या काही आठवणी शेअर करतोय...
आईचं शिक्षण जेमतेम ७ वीपर्यंत होतं, मात्र तिचं ज्ञान भल्याभल्या पंडितांना लाजवेल, असं होतं. आम्हा भावंडांमध्ये मी सर्वात लहान. मला खेळायची खूप आवड होती. मग कधी कोपर फोड, कधी ढोपर फोड असं सुरूच असायचं. पण आई प्रचंड शिस्तप्रिय होती म्हणून खेळासह ती माझ्याकडून अभ्यासही करून घ्यायची. आईच्या संस्कारामुळेच आम्हाला शिक्षणाची गोडी लागली. आईची आवडती गोष्ट म्हणजे भाजीमंडईत जाऊन भाजी खरेदी करणे. आईचा लाडका असल्यामुळे मीही आईसोबत तिच्या मागे मागे मंडईत जायचो. २५ पैशांची भाजी आई १५ पैशात घेते हे पाहून मला भलतं कुतूहल वाटायचं. मी त्या गोष्टीचे बारीक निरीक्षण करायचो. कदाचित राज्याचा आर्थिक भार सांभाळत असताना हाच अभ्यास मला कामाला आला असावा. खरंतर तिची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी एक नवीन धडा असायची.
संकटाच्या काळात आई नेहमीच माझं प्रेरणास्थान राहिली आहे. बापूंनी स्वतःला समाजकारणात झोकून दिले असताना आईने त्यांच्या संसाराचा डोलारा अगदी व्यवस्थित उभा केला. प्रत्येकाला आपुलकीने विचारयाची आणि मायेनं जवळ घ्यायची तिची सवय आजही आठवते. मदर्स डे निमित्त माझ्या आईला भरपूर प्रेम आणि या भूमीवरील प्रत्येक मातेला वंदन, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लिपुलेख-मानसरोवर लिंक रोड तयार; चीनवर भारी पडणार भारतीय लष्कर
पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली
CoronaVirus: कोरोनावर लस तयार करण्याच्या भारत फक्त एक पाऊल दूर; प्राण्यांवर होणार ट्रायल
CoronaVirus News : धक्कादायक! जळगावात आणखी ११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले
CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी
CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका
CoronaVirus News : इस्लामपुरातील राष्ट्रवादीचा फरारी नगरसेवक खंडेराव जाधवला अटक