मातांना मिळणार एका क्लिकवर माहिती

By admin | Published: July 27, 2016 02:42 AM2016-07-27T02:42:52+5:302016-07-27T02:42:52+5:30

आई झाल्यावर महिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना बाळाच्या संगोपनासाठी अनेक जण सल्ले देत असतात. त्याचबरोबर, इंटरनेटच्या जमान्यात तर स्वत: माता शिशूच्या पोषणासाठी

Mothers will get information on one click | मातांना मिळणार एका क्लिकवर माहिती

मातांना मिळणार एका क्लिकवर माहिती

Next

मुंबई : आई झाल्यावर महिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना बाळाच्या संगोपनासाठी अनेक जण सल्ले देत असतात. त्याचबरोबर, इंटरनेटच्या जमान्यात तर स्वत: माता शिशूच्या पोषणासाठी नवीन गोष्टी ‘सर्च’ करत असतात, पण अनेकदा साइट्सवर मिळणाऱ्या गोष्टींची सत्यता पडताळलेली नसते.
चुकीचे उपाय केल्यास बाळाला अपाय होऊ शकतो. हे टाळण्यासाठी केईएम रुग्णालय आणि युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड (युनिसेफ) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिशुपोषण’ नावाचे एक ‘अ‍ॅप्लिकेशन’(अ‍ॅप) तयार करण्यात आले आहे.
महापालिकेच्या केईएम रुग्णालयाने पुढाकार घेऊन युनिसेफ, ब्रेस्ट फिडिंग प्रमोशन्स नेटवर्क आॅफ इंडिया आणि मुंबई ब्रेस्ट फिडींग प्रमोशन कमिटी यांच्या सहकार्याने गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी ‘शिशुपोषण’ हे अ‍ॅप तयार केले आहे. स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून २ आॅगस्ट रोजी या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व पोषकतत्त्वे सुयोग्य प्रमाणात असतात. त्यामुळे बाळ जन्माला आल्यापासून सहा महिन्यांचे होईपर्यंत निव्वळ स्तनपान देण्याची गरज असते.
त्यामुळे महिलांना शास्त्रशुद्ध माहिती मिळावी, म्हणून तज्ज्ञ डॉक्टरर्स आणि संबंधित क्षेत्रातील संस्थांनी मिळून हे अ‍ॅप तयार केले आहे, अशी माहिती केईएम रुग्णालयातील जनऔषधशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. कामाक्षी भाटे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Mothers will get information on one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.