गोरेगावच्या मोतीलालनगर वसाहतींचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:10 AM2021-09-09T04:10:43+5:302021-09-09T04:10:43+5:30
-सुभाष देसाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोरेगावच्या मोतीलालनगर येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास खासगी विकासकांऐवजी म्हाडामार्फत करण्याची जोरकस मागणी ...
-सुभाष देसाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगावच्या मोतीलालनगर येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास खासगी विकासकांऐवजी म्हाडामार्फत करण्याची जोरकस मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत लावून धरली.
म्हाडाच्या गोरेगाव पश्चिमेतील मोतीलालनगर १, २ आणि ३ येथे सुमारे १४३ एकर जागेवर तीन हजार ७०० गाळे आहेत. या जागेचा विकास करण्याचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागातर्फे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीपुढे आला. परंतु येथील पत्राचाळीच्या विकासाचा अनुभव पाहता मोतीलाल नगरचा विकास करताना खासगी विकासकाची नेमणूक करू नये, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
मोतीलाल नगरातील पाच हजार झोपड्यांच्या पुनर्विकासाचा तपशील अद्याप उपलब्ध नाही. त्यात खासगी विकासकाकडून या चाळीचा पुनर्विकास होणार असेल तर ३३ हजार जादा घरे बांधली जाणार आहेत. त्यामुळे सुमारे दीड लाख वस्तींची भर पडणार आहे. या सर्वांना पाणी, मलनिस्सारण आदी सुविधांचा ताण मुंबई महापालिकेवर पडणार आहे. त्यामुळे यासाठी महापालिकेचा अभिप्राय घेणे आवश्यक असल्याचे देसाई म्हणाले. मोतीलालनगरचा विकास म्हाडा करेल, असे म्हाडाने यापूर्वीच उच्च न्यायालयातदेखील स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदर प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची सूचना देसाई यांनी केली.