स्थायी समितीला प्रस्ताव मंजुरीची घाई
By admin | Published: August 22, 2014 12:28 AM2014-08-22T00:28:11+5:302014-08-22T00:28:11+5:30
स्थायी समितीने चर्चा न करताच 62 कोटी 87 लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. सहा मिनिटामध्ये सभा गुंडाळण्यात आली.
Next
नवी मुंबई : स्थायी समितीने चर्चा न करताच 62 कोटी 87 लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. सहा मिनिटामध्ये सभा गुंडाळण्यात आली. अनेक प्रस्ताव अंदाजपत्रकापेक्षा 28 ते 37 टक्के जादा दराने असतानाही एकाही सदस्याने शंका उपस्थित न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी करोडो रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले होते. जवळपास 7क्क् कोटींचे प्रस्ताव मंजूर करताना एकाही प्रस्तावावर चर्चा झाली नव्हती. आता विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा चर्चेविना प्रस्ताव मंजूर करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. गुरुवारच्या सभेमध्ये सभापती सुरेश कुलकर्णी गैरहजर होते. यामुळे राजू शिंदे यांना हंगामी सभापती बनविण्यात आले होते. त्यांनी विषय चर्चेला टाकताना चर्चेची संधी न देताच मंजुरीची घोषणा करण्यास सुरुवात केली. प्रस्ताव मंजुरीसाठी टाकत आहे, सर्व मताने मंजूर अशी घोषणा करत सहा मिनिटांत विकासकामांचे सर्व प्रस्ताव मंजूर केले. विशेष म्हणजे सर्वाना मंजुरीसाठी हात वर करण्यासही संधी दिली जात नव्हती.
स्थायी समितीमध्ये काही लाखांचा प्रस्ताव असला तरी अनेक वेळा अर्धा ते एक तास चर्चा होत असते. परंतु आज कोणीच चर्चा केली नाही. राष्ट्रवादीसह शिवसेना व इतर पक्षाच्या नगरसेवकांनीही मौन धारण केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. महिला सक्षमीकरण केंद्र बांधणो, समाज मंदिर,क्रीडा संकुल, पामबीच रोडवरील तलाव परिसराचे सुशोभीकरण, स्मशानभूमी, कोंडवाडय़ाच्या ठिकाणी बहुउद्देशीय इमारत व इतर अनेक महत्वाचे प्रस्ताव होते. परंतु एकाही सदस्याने चर्चा केली नाही. सभापतीने तत्काळ सभा संपल्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)
वाढीव दराची खैरात
घणसोलीमध्ये महिला सक्षमीकरण केंद्र बांधण्याचा प्रस्ताव 35.65 टक्के जादा दराने, सीबीडीतील समाज मंदिर 37.37 टक्के, सीबीडी क्रीडासंकुल 32.5क् टक्के, पामबीच रोडवरील वॉटरबॉडीचे सुशोभीकरणाचा प्रस्ताव 28.99, कुकशेतमधील व्यायामशाळा 33 टक्के कोपरी स्मशानभूमी 29.5क्, नेरूळमधील कोंडवाडय़ाच्या ठिकाणी बहुउद्देशीय इमारत बाांधण्याचा प्रस्ताव 29 टक्के जादा दराने मंजूर करण्यात आला आहे. महिला सक्षमीकरण केंद्रासह इतर वास्तूच्या बांधकामासाठी प्रतिचौरस फुटाला जवळपास 29क्5 रुपये बांधकाम खर्च येणार असून त्यावरही कोणीच आक्षेप घेतला नाही.