लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय मच्छिमार नेते व वेसाव्याचे माजी नगरसेवक स्वर्गीय मोतीराम भावे यांच्या द्वितीय स्मृतिदिनी त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘‘द्रष्टा लोक नेता मोतीराम भावे’’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा समारंभ महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, राष्ट्र सेवादल आणि स्वराज सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शनिवार सायंकाळी ६.३० वाजता. चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर, कास्कर उद्यान, पंच मार्ग, यारी रोड, वर्सोवा येथे सामाजिक आणि राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमाला मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, परिवहन व संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, खासदार गजानन कीर्तिकर, शिवसंग्रामचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे, स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार भाई जगताप, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार रमेश पाटील, आमदार कपिल पाटील, माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे, स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे, मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे, नगरसेवक योगिराज दाभडकर, नगरसेविका रंजना पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
------------------------------------------