Join us

पार्क केलेल्या टेम्पोला मोटारसायकलची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 9:19 AM

- भरधाव वेगाने गाडी चालवणे बेतले जीवावर\Sपार्क केलेल्या टेम्पोला मोटारसायकलची धडकबापलेकाचा मृत्यू : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दुर्घटना...

- भरधाव वेगाने गाडी चालवणे बेतले जीवावर

\Sपार्क केलेल्या टेम्पोला मोटारसायकलची धडक

बापलेकाचा मृत्यू : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर भरधाव येणारी मोटारसायकल पार्क केलेल्या टेम्पोला धडकली. या अपघातात बापलेकाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. याप्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

श्रीमुनी काशी माळी (८०) आणि रवी श्रीमुनी माळी (३१) अशी मृतांची नावे आहेत. मालाड पूर्वच्या शिवाजीनगर परिसरात हे राहत होते. शनिवारी सकाळी ते काही कामानिमित्त माेटारसायकलवरून पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दादरच्या दिशेने निघाले होते. भरधाव निघालेली ही मोटारसायकल सांताक्रुझ पूर्वच्या वाकोला ब्रीजवर येताच रवीचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती माेटारसायकल जवळच उभ्या असलेल्या पार्किंगमधील टेम्पोला धडकली.

यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर खोलम यांनी सांगितले.