जे जे च्या कोविड योद्धयांना मोटर सायकल; CSR फंडातून हिरोचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 09:50 PM2022-08-22T21:50:41+5:302022-08-22T21:50:47+5:30
सर जे जे समूह रुग्णालयाच्या अंतर्गत, जी टी रुग्णालय, कामा महिला आणि लहान मुलांचे रुग्णालय आणि सेंट जॉर्जेस रुग्णालय यांचा समावेश आहे.
संतोष आंधळे
मुंबई : रुग्ण सेवा तसेच रुग्णालयातील प्रशासकीय कामासाठी रुग्णलायाच्या परिसरात आणि इतरत्र तात्काळ पोचता यावे, याकरिता हिरो मोटर कॉर्प या कंपनीने सामाजिक दायित्व निधीतून ( सी एस आर ) जे जे रुग्णालयाला ४० मोटार सायकल देण्यात आल्या. याकरीता लायन्स क्लब ऑफ मुलुंडच्या संस्थेने विशेष प्रयत्न केले होते.
सर जे जे समूह रुग्णालयाच्या अंतर्गत, जी टी रुग्णालय, कामा महिला आणि लहान मुलांचे रुग्णालय आणि सेंट जॉर्जेस रुग्णालय यांचा समावेश आहे. रुग्णालयाच्या प्रशासकीय कामाकरिता कर्मचाऱ्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या संलग्न रुग्णालयात जावे लागत असते. विशेष करून कोरोना काळात कर्मचाऱ्यांची विशेष धावपळ होत होती. हा सर्व प्रकार लायन्स क्लब ऑफ मुलुंडचे अध्यक्ष वीरेंद्र कटियाल यांनी गेल्यावर्षी पाहिला होता. त्यांनी कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन हिरो मोटर कॉर्प या कंपनीच्या साहाय्याने रुग्णालयाला ४० मोटार सायकल दिल्या.
४० पैकी, प्रत्येकी ५ मोटार सायकल या संलग्न रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सोमवारी या मोटार सायकल वाटपाचा कार्यक्रम जे जे रुग्णलयाच्या परिसरात पार पडला. यावेळी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे, अधीक्षक डॉ संजय सुरासे, कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ तुषार पालवे उपस्थित होते.