७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी सामंजस्य करार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 07:05 AM2023-03-30T07:05:09+5:302023-03-30T07:05:16+5:30

राज्यात  १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत.

MoU for adoption of 750 Anganwadis; Information from Minister Mangalprabhat Lodha | ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी सामंजस्य करार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी सामंजस्य करार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

googlenewsNext

मुंबई : राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासंदर्भातील बुधवरी मंत्रालयात दहा सामाजिक संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला. ऑक्टोबरपासून हे दत्तक धोरण राबविण्यात येत असून आतापर्यंत त्यात आणखी ७५० अंगणवाड्यांची भर पडली आहे. राज्यात एकूण ४,४१८ अंगणवाड्यांचा विकास या माध्यमातून होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी दिली.

राज्यात  १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. आणि व्यक्ती, कुटुंब आणि  समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. 

संस्था आणि त्यांनी दत्तक घेतलेल्या अंगणवाड्या 
 दालमिया फांउडेशन यांनी सोलापूर-कोल्हापूरमधील १० 
  भगीरथी फांउडेशनने पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथील १५ 
  कॉरबेट फाउंडेशनने 
पुणे येथील १६ 
 युनायटेड वे ऑफ हैद्राबाद यांनी पुणे येथील २० 
 आर. एस. एस. जनकल्याण समितीने मुंबई उपनगरमधील २५
  होप फॉर दि चिल्ड्रेन यांनी पुण्यातील ४१ 
 युनायटेड वे यांनी दिल्ली पुणे येथील ४५ 
  रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१  यांनी पुणे येथील १०० 
 के कॉर्प फांउडेशन  गडचिरोली, नंदुरबार १७९ 
  यार्दी फाउंडेशन पुण्यातील ३०० अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत.

Web Title: MoU for adoption of 750 Anganwadis; Information from Minister Mangalprabhat Lodha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.