मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशन लिमिटेड (एमएमआरसी) आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार एमआयएएल मेट्रो प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तीन मेट्रो स्टेशनच्या बांधकामाकरिता जागा व निधी देणार आहे.कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पामुळे मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे जोडली जाणार असून विमानतळापर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे. मेट्रो ३च्या बांधकामात योग्य सहभाग देण्यासही या कराराद्वारे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने मंजुरी दिली आहे. मुंबई रेल कॉपोर्रेशनतर्फे कार्यकारी संचालक आर. रमणा व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक एस. के. गुप्ता इ. उपस्थित होते. (प्रतिनिधी)यांनी केली स्वाक्षरीमेट्रो ३ अंतर्गत होऊ घातलेल्या सहार रोड, स्थानिक विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मेट्रो स्टेशनच्या बांधकामासाठी ७७७ कोटी देण्यास एमआयएएलने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाला आवश्यक असणारी जागा देण्यासही एमआयएएलने सहमती दर्शविली आहे.
मेट्रो ३ साठी सामंजस्य करार
By admin | Published: September 19, 2015 4:22 AM