Join us

सीआयएफईचा भूमीपूत्र फाउंडेशनसोबत सामंजस्य करार 

By मनोहर कुंभेजकर | Published: May 07, 2024 6:31 PM

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील भूमिपूत्रांना सरकारी योजनेची माहिती सोप्या पद्धतीने आणि एग्री बिजनेस इनक्युबेशन सेंटर मुंबईच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमाने पोहचेल. 

मुंबई- वर्सोवा स्थित भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे  केंद्रीय मत्स्यकी शिक्षा संस्थान म्हणजेच आयसीएआर-सीआयएफई मुंबई यांच्याबरोबर भूमीपूत्र फाउंडेशन सामंजस्य करार केला. मुंबई महानगर प्रदेशातील भूमिपूत्रांसोबत त्यांच्या उद्योजकीय विकास आणि सामाजिक काम करणाऱ्या भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक विकास कोळी यांनी मत्स्यकी विषयावर कार्य व एग्री बिजनेस इनक्युबेशन सेंटर संस्थेसोबत सदर सामंजस्य करार केला.

यावेळी संस्थेचे संचालक डॉ. सी एन रविशंकर, एग्री बिजनेस इंक्यूबेशनचे सर्वेसर्वा डॉ. येस पी शुक्ला, तसेच डॉ. शिवाजी अरगडे, डॉ लायाना, स्नेहल शितोले, काशीराम भानजी, पुरुषोत्तम भगत उपस्थित होते. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील भूमिपूत्रांना सरकारी योजनेची माहिती सोप्या पद्धतीने आणि एग्री बिजनेस इनक्युबेशन सेंटर मुंबईच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमाने पोहचेल. 

तसेच स्थानिक विविध उद्योग उभे राहतील असे विकास  कोळी यांनी सांगितले. माहिम येथील फूडप्लाझा आणि विविध स्थानिक विषयावर महाराष्ट्र राज्याच्या मत्स्यवसाय विभागाशी सीआयएफईचा सामंजस्य करार आहे, त्यासाठी सुद्धा काम करावे, आणि भूमीपूत्रांचा सामाजिक विकास करावा अशा शुभेच्छा संचालक डॉ रविशंकर यांनी दिल्या. 

टॅग्स :मुंबई