बेकायदा कामासाठी डोंगरच पोखरला

By admin | Published: February 1, 2015 11:22 PM2015-02-01T23:22:44+5:302015-02-01T23:22:44+5:30

पालिका हद्दीच्या वरसावे परिसरातील स्थानिक भूमाफीयांकडून बेकायदा बांधकामांसाठी डोंगर पोखरण्यात येत असून त्याकडे महसूल विभाग हेतुपुरस्सर डोळेझाक करीत

The mountains clambered for unauthorized work | बेकायदा कामासाठी डोंगरच पोखरला

बेकायदा कामासाठी डोंगरच पोखरला

Next

राजू काळे ल्ल भाईंदर
पालिका हद्दीच्या वरसावे परिसरातील स्थानिक भूमाफीयांकडून बेकायदा बांधकामांसाठी डोंगर पोखरण्यात येत असून त्याकडे महसूल विभाग हेतुपुरस्सर डोळेझाक करीत असल्याचे त्यांच्या दिरंगाईवरुन स्पष्ट होत आहे.
येथील पश्च्मि महामार्गालगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या जागेत अनेक अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. शहरात सध्या मोकळी जागा नसल्याने भूमाफीया थेट घोडबंदर नदी किनाऱ्यालगतच्या तिवर क्षेत्रावर वक्रदृष्टी ठेऊन आहेत. तर काही भूमाफीयांनी उद्यानाच्या बाजुकडील डोंगरच पोखण्यास सुरुवात केली आहे.
येथील शेल्टर हॉटेललगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पडीक बरेकजवळ बेकायदा बांधकाम करण्यासाठी थेट डोंगरच पोखण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी गावठाण असल्याने सध्या येथे सर्वे अथवा सिटी सर्व्हे क्रमांक पडला नसल्याचा गैरफायदा येथील भूमाफीया उठवत असून येथील मूळ ग्रामस्थांच्या नावाने ते बोगस कागदपत्रे तयार करीत आहे. इतरांनी मूळ मालकांकडून खरेदी केलेल्या जागा आपल्याच मालकीच्या असल्याचा बनाव ते करीत सुटले असून पालिकेच्या बांधकाम परवानगीलाही ते फाट्यावर मारत आहेत. याबाबत स्थानिक ग्रामस्थांत संतापाचे वातावरण असून त्यासाठी ते त्या भूमाफीयांना धडा शिकविण्याच्या पावित्र्यात आहे. कारण या भूमाफीयांकडून परिसरात अगोदरच मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. त्यामुळे मूळ ग्रामस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय हे भूमाफीया स्थानिक असतानाही ते खोटे कागदपत्रे तयार करुन जमिन लाटण्याच्या व्यवहारातील मोठे गुन्हेगार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी ते महसूल विभागासह स्थानिक पोलिसांनाही खिशात ठेऊन असल्याचे रवी पाटील या बेकायदेशीर मातीभराव करणाऱ्या माफीयाकडून सांगितले जात आहे. या माफीयांवर जानेवारी २०१२ मध्ये येथील नैसर्गिक नाल्यात बेकायेशीर माती भराव केल्याप्रकरणी त्यावेळचे मंडळ अधिकारी बोंबे, तलाठी अभिजित बोडके व देशमुख यांना केवळ लोकमतच्या वृत्तामुळेच रंगेहाथ पकडले होते.
कारवाईदरम्यान पाटील याच्या मालकीचे जेसीबी ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात काशिमिरा पोलिसांत गुन्हा देखील नोंदविल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, पुढे महसुल विभागाच्या अंतर्गत तडजोडीने पाटील मोकाट सुटल्याने त्याने निलेश लोहार, अश्फाक, बबलु सिंग आदी साथीदारांच्या सहकार्याने पुन्हा आपल्या बेकायदेशीर प्रकारांना सुुरुवात केली आहे. यंदा तर त्याने आपले कार्यालय थाटण्यासाठी चक्क डोंगर पोखरण्यास सुरुवात केली असून लगतच्या खाजगी जमिनीसुद्धा दादागिरीने लाटण्यास सुरुवात केल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे असून त्या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

Web Title: The mountains clambered for unauthorized work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.