शिपिंग कॉरिडॉर ८० मैलापर्यंत स्थानांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:06 AM2021-03-18T04:06:37+5:302021-03-18T04:06:37+5:30

मुंबई: शिपिंग कॉरिडॉर ८० मैलापर्यंत स्थानांतरित करा अशी आग्रही मागणी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार गजानन ...

Move the shipping corridor to 80 miles | शिपिंग कॉरिडॉर ८० मैलापर्यंत स्थानांतरित करा

शिपिंग कॉरिडॉर ८० मैलापर्यंत स्थानांतरित करा

Next

मुंबई:

शिपिंग कॉरिडॉर ८० मैलापर्यंत स्थानांतरित करा अशी आग्रही मागणी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी संसदेत केली. दिल्लीवरून त्यांनी या संदर्भात लोकमतला सविस्तर माहिती दिली.

मालवाहू जहाजांसाठी समुद्र किनाऱ्यापासून अंदाजे १५ ते ३५ सागरी मैलमध्ये शिपिंग कॉरिडॉर केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला आहे. मच्छीमार बांधव १५ ते ३५ सागरी मैलमध्ये मासेमारी करतात. समुद्र किनारी राहणाऱ्या मच्छीमार बांधवांचे मासेमारी हे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. पिढ्यानपिढ्या सागरी किनारी राहणाऱ्या मच्छीमार बांधवांमध्ये या शिपिंग कॉरिडॉरमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच क्षेत्रामध्ये शिपिंग कॉरिडॉर निश्चित केल्यास मासेमाऱ्यांची पसरलेली जाळी तुटून मोठ्या मालवाहू जहाजांमुळे समुद्रात प्रदूषण होऊन मत्स्यव्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.

केंद्र शासनाने प्रस्तावित शिपिंग कॉरिडॉर १५ ते ३५ मैल ऐवजी ८० सागरी मैला पलीकडे स्थानांतरित करुन मच्छीमार बांधवांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी संसदेच्या सभागृहात शून्य प्रहरात मांडली असल्याचे खासदार कीर्तिकर यांनी सांगितले.

Web Title: Move the shipping corridor to 80 miles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.