Join us

रिक्षाचालकांचे १७ जूनला आंदोलन

By admin | Published: May 26, 2015 1:58 AM

अवैध वाहतुकीवर कारवाई करावी आणि हकीम समिती बरखास्त करू नये, अशी मागणी करीत आॅटोरिक्षा मालक-चालक संघटना संयुक्त कृती समितीने १७ जून रोजी आंदोलनाची हाक दिली आहे.

मुंबई : अवैध वाहतुकीवर कारवाई करावी आणि हकीम समिती बरखास्त करू नये, अशी मागणी करीत आॅटोरिक्षा मालक-चालक संघटना संयुक्त कृती समितीने १७ जून रोजी आंदोलनाची हाक दिली आहे.आॅटोरिक्षा मालक-चालक संघटना संयुक्त कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. १७ जून रोजी आॅटोरिक्षा चालक-मालक धंदा न करता त्या त्या शहरात मोर्चे, धरणे आंदोलन करतील, असे या समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले. गरज पडल्यास बेमुदत आंदोलनही केले जाईल. परिवहन मंत्री हे रिक्षाचालकांविरोधात बेताल वक्तव्ये करतानाच हा व्यवसायही संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राव यांनी या वेळी केला. (प्रतिनिधी)