सायन रुग्णालयात सफाई कामगारांचे आंदोलन

By Admin | Published: April 12, 2016 01:38 AM2016-04-12T01:38:52+5:302016-04-12T01:38:52+5:30

सफाई कामगाराने बदली कामगार आल्याशिवाय जागा सोडायची नाही, कामगारांच्या कामात बदल, नैमित्तिक रजा पूर्वमंजुरीशिवाय घ्यायची नाही, असे परिपत्रक सफाई कामगारांसाठी

Movement of cleaning workers at Sion Hospital | सायन रुग्णालयात सफाई कामगारांचे आंदोलन

सायन रुग्णालयात सफाई कामगारांचे आंदोलन

googlenewsNext

मुंबई : सफाई कामगाराने बदली कामगार आल्याशिवाय जागा सोडायची नाही, कामगारांच्या कामात बदल, नैमित्तिक रजा पूर्वमंजुरीशिवाय घ्यायची नाही, असे परिपत्रक सफाई कामगारांसाठी सायन रुग्णालयात काढण्यात आले होते. या परिपत्रकाला विरोध करण्यासाठी सोमवारी दुपारी सफाई कामगारांनी आंदोलन पुकारले होते.
सायन रुग्णालयात रुग्णांचा आणि नातेवाईकांचा वावर जास्त असल्याने रुग्णालयात अस्वच्छता पसरते. रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी वॉर्डबाहेरील व्हरांड्याच्या सफाईबरोबरच संपूर्ण वॉर्ड आठवड्यातून दोनदा पाण्याने धुऊन काढायचा. नैमित्तिक रजा पूर्वपरवानगीशिवाय घ्यायची नाही, एक बदली कामगार कामावर आल्याशिवाय दुसऱ्या बदली कामगाराने कामावरून घरी जाऊ नये, असे नवीन परिपत्रक रुग्णालयाने जारी केले होते. या परिपत्रकाला विरोध करण्यासाठी सोमवारी दुपारी सफाई कामगारांनी आंदोलन पुकारले होते.
परिपत्रकाला विरोध करण्यासाठी रुग्णालय परिसरात सफाई कामगार एकत्र जमले होते. हे आंदोलन चिघळल्यास रुग्णालयाची स्वच्छता होणार नाही. म्हणून रुग्णालय प्रशासनाने तत्काळ म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना व म्युनिसिपल मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत कामगारांचा विरोध लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने हे परिपत्रक अखेर मागे घेतले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Movement of cleaning workers at Sion Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.