वीज कर्मचाऱ्यांचे प्रकाशगडावर आंदोलन

By Admin | Published: October 28, 2015 12:09 AM2015-10-28T00:09:40+5:302015-10-28T00:09:40+5:30

महावितरण आणि महानिर्मितीच्या कामगार व वीज ग्राहक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी वांद्रे येथील

Movement of electricity workers on the lighthouse | वीज कर्मचाऱ्यांचे प्रकाशगडावर आंदोलन

वीज कर्मचाऱ्यांचे प्रकाशगडावर आंदोलन

googlenewsNext

मुंबई : महावितरण आणि महानिर्मितीच्या कामगार व वीज ग्राहक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात महावितरणचे १६ झोन व महानिर्मितीच्या ९ वीजनिर्मिती केंद्रांतून हजारो आंदोलक सामील झाले होते.
तत्कालीन विद्युत मंडळाचे दहा वर्षांपूर्वी विभाजन झाल्यानंतर निर्माण झालेल्या वीज कंपन्यांमध्ये वीज कर्मचारी वर्गाची गळचेपी सुरू आहे. आवश्यकता नसूनही खासगीकरणाचे धोरण अवलंबिले जात आहे. शिवाय रिक्त पदे भरली जात नाहीत, कंत्राटी पद्धतीला चालना दिली जात आहे. बैठका घेण्यात आल्या. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने, आंदोलन छेडण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Movement of electricity workers on the lighthouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.