मुंबई- सेव्ह आरेचा नारा देत आज अनेक स्वयंसेवी संस्थांनी मेट्रो कार शेड रद्द करण्याची मागणी करत आरे मिल्क कॉलनीतील पिकनिक स्पॉटवर आरे वाचवा मोहिमेत भाग घेतला. मोठा पोलिस बंदोबस्त होता. वॉचडॉग फाउंडेशन, वनशक्ती, डेव्ह आरे ग्रुप आदींनी कारशेड जवळ सेव्ह आरे असा नारा देत आंदोलनात सहभाग घेतला.यावेळी आदित्य ठाकरे होश में आवोच्या घोषणा देण्यात आल्या. महाविद्यालयीन विद्यार्थी व 10 एनजीओ या आंदोलनात सहभागी झाले.
या संदर्भात वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड.ग्राडफे पिमेटा म्हणाले की, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 2019 साली आरे येथील मेट्रो कार शेड प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.. मात्र मंत्री झाल्यावर त्यांना याचा विसर पडला. मेट्रो कारशेड इतर ठिकाणी नेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही मेट्रो कारशेडचे काम सुरू असल्याने आम्ही आज येथे आंदोलन केले.मुंबईचे फुफुस अशी आरेची ओळख असून मुंबईला ऑक्सिजन पुरवठा करण्याची क्षमता आरेमध्ये आहे. इथे मेट्रोसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यास जैवविविधता धोक्यात येईल अशी भीती अँड.पिमेटा यांनी व्यक्त केली. मेट्रोच्या कारशेड संदर्भात सरकारकडे कोणताही ठोस आराखडा नाही.मग प्रशासन कशाच्या आधारावर आरेतील झाडे तोडत आहे असा सवाल वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा यांनी केला.