विविध मागण्यांसाठी आराेग्यसेविकांचे आझाद मैदानात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:07 AM2020-12-22T04:07:44+5:302020-12-22T04:07:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विविध मागण्यांसाठी महापालिका आरोग्यसेवा कर्मचारी संघटना मुंबईच्या सामुदायिक आरोग्यसेविकांनी आझाद मैदानावर साेमवारी आंदोलन केले. ...

Movement of health workers in Azad Maidan for various demands | विविध मागण्यांसाठी आराेग्यसेविकांचे आझाद मैदानात आंदोलन

विविध मागण्यांसाठी आराेग्यसेविकांचे आझाद मैदानात आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विविध मागण्यांसाठी महापालिका आरोग्यसेवा कर्मचारी संघटना मुंबईच्या सामुदायिक आरोग्यसेविकांनी आझाद मैदानावर साेमवारी आंदोलन केले. आरोग्यसेविकांना किमान वेतन जारी करावे, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रकाश देवदास यांनी सांगितले, पालिका प्रशासनाने १५ दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. या मुदत कालावधीत प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही सांगितले आहे, तसे न केल्यास आरोग्यसेविका पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतील.

‘कामगार कायद्याचे पालन करा, नाहीतर खुर्ची खाली करा’ असे फलक घेऊन आरोग्यसेविकांनी पालिका प्रशासनासमोर आपल्या मागण्या मांडल्या. मुंबईत नागरिकांच्या घरोघरी जाऊन सेवा करणाऱ्या आरोग्य सेविकांनी अन्याय होत असल्याच्या कारणावरून हे आंदोलन केले होते. सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत एकही सुट्टी न घेता, ही माेहीम आरोग्यसेविकांनी यशस्वी केली. अहोरात्र राबणाऱ्या या आरोग्यसेविकांना गर्भारपणात एकही रजा दिली जात नाही, निवृत्त होताना एकही पैसा दिला जात नाही, अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत.

.............................

Web Title: Movement of health workers in Azad Maidan for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.