महाजनांच्या घरासमोर आंदोलन करावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2016 04:40 AM2016-09-13T04:40:02+5:302016-09-13T04:40:02+5:30

विनोदवीर कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन करण्याअगोदर लाच देऊ करणाऱ्या ठेकेदारांची नावे जाहीर करा म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या घरासमोर आंदोलन करावे

Movement before Mahajana's house! | महाजनांच्या घरासमोर आंदोलन करावे!

महाजनांच्या घरासमोर आंदोलन करावे!

Next

मुंबई : विनोदवीर कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन करण्याअगोदर लाच देऊ करणाऱ्या ठेकेदारांची नावे जाहीर करा म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या घरासमोर आंदोलन करावे, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत भाजपा आमदार राम कदम यांना दिले आहे.
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच लाख रूपयांची लाच मागितली असा आरोप कपिल शर्माने टष्ट्वीटवर केला होता. त्यामुळे शिवसेना भाजपचा भ्रष्ट चेहरा उघडा पडला, आता नैतिकतेचे उसने अवसान आणत कदम हे कपिलच्या घरासमोर आंदोलन करत असल्याचेही सावंत म्हणाले.
दीड वर्षापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला काही ठेकेदारांनी १०० कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट केला होता. या ठेकेदारांची नावे महाजन यांनी अद्याप जाहीर केलेली नाहीत. या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवून चौकशीची मागणी कॉंग्रेसने केली होती. कपिलच्या टष्ट्वीटवर तातडीने चौकशीचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता गिरीश महाजन यांना लाच देणाऱ्या ठेकेदारांची नावे उघड करण्याचे आदेश द्यावेत व आजपर्यंत ही नावे का लपवलेली आहेत, याचा जाब विचारावा अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
कदम यांनी, गिरीश महाजनांच्या घरासमोर आंदोलन करून महाजन नेमके भाजपच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यांच्या दबावाखाली नावे दडवीत आहेत? अशी विचारणा करण्याचे धाडस दाखवावे, असेही सावंत म्हणाले. 

Web Title: Movement before Mahajana's house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.