मलंगमुक्तीचे आंदोलन सुरूच राहणार
By admin | Published: February 1, 2015 11:13 PM2015-02-01T23:13:14+5:302015-02-01T23:13:14+5:30
सध्या सरकारमध्ये असलो तरी एक शिवसैनिक म्हणून मलंगमुक्तीचे आंदोलन सुरूच राहणार अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
कल्याण : सध्या सरकारमध्ये असलो तरी एक शिवसैनिक म्हणून मलंगमुक्तीचे आंदोलन सुरूच राहणार अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंगळवारी ३ फेब्रुवारीला मलंगगडावर मलंगनाथांचा उत्सव होणार आहे. यासंदर्भात माहीती देताना पुढल्या वर्षी फ्युनिक्युलर ट्रॉलीनेच यात्रेकरूंना गडावर नेण्याबाबतचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना आणि अन्य हिंदू संघटनांच्या वतीने श्रीमलंग मुक्तीचे आंदोलन दरवर्षी केले जाते. यंदाच्या आंदोलनाची माहीती देण्यासाठी कल्याणात एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मलंगगडावरील मच्छींद्रनाथांच्या मंदीरावर विश्वस्त नेमण्याला गती देणार असून न्यायालयीन दाव्याबाबतही निकाल मिळण्याला चालना देण्याचे त्यांनी संकेत दिले. श्रीमलंगगडावर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गडावर मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांना रोखण्याचा संकल्पही केला आहे.