नियुक्तीच्या प्रतीक्षेतील मराठा उमेदवारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:24 AM2020-12-14T04:24:41+5:302020-12-14T04:24:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी विविध पदांवर निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापनेचा प्रश्न गंभीर ...

Movement of Maratha candidates awaiting appointment | नियुक्तीच्या प्रतीक्षेतील मराठा उमेदवारांचे आंदोलन

नियुक्तीच्या प्रतीक्षेतील मराठा उमेदवारांचे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी विविध पदांवर निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापनेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेतील या उमेदवारांनी आझाद मैदानात उपोषण आंदोलन छेडले आहे. राज्य सरकारने भरती प्रक्रिया थांबविण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून (एसईबीसी) तलाठी, महावितरण, मेट्रो, राज्यसेवा अशा विविध विभागात २१८५ उमेदवार यशस्वी झाले होते. नियुक्तीच्या प्रतीक्षेतील या उमेदवारांची सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना काळात अंतिम नियुक्ती आदेश रखडले. ही दिरंगाई राज्य सरकारकडून झालेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे या पेचातून मार्ग निघेपर्यंत सर्व नियुक्त्या थांबवाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

सरकारने मराठा आरक्षणातील उमेदवारांना तात्पुरते वगळून इतर घटकांच्या नियुक्ती केल्यास सेवाज्येष्ठतेचा प्रश्न निर्माण होतो, असा दावाही आंदोलकांकडून केला जात आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांना अडविले जात आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी तपासणी मोहीम हाती घेतली. काही आंदोलकांच्या गाड्या पकडण्यात आल्या. मात्र, त्यातूनही लोकलसह अन्य मार्गांनी आंदोलक आझाद मैदानात पोहोचल्याचे मराठा समन्वयकांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज आझाद मैदान येथे जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. राज्य सरकार आपले कोणतेच आश्वासन पाळत नसल्याचा आरोप त्यांनी या भेटीनंतर केला. एका आठवड्यात सामील करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण आज आठ महिने झाले तरी हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. या उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याची माहिती सरकारने कोर्टात दिली असती तर वैद्यकीय प्रवेशासाठी जशी सूट दिली गेली तशी सूट मिळू शकली असती. या नोकरभरतीत दिरंगाई झाली नसती असे दरेकर यांनी सांगितले.

Web Title: Movement of Maratha candidates awaiting appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.