Join us  

‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली

By सीमा महांगडे | Published: September 20, 2024 5:32 AM

रस्त्याचा एक भाग गेल्या आठवड्यात खुला करण्यात आल्याने मुंबईच्या वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली आहे.

सीमा महांगडे

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरून (कोस्टल रोड) गेल्या सहा महिन्यांत ४० लाखांहून अधिक वाहनांनी सुसाट प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच रस्त्याचा एक भाग गेल्या आठवड्यात खुला करण्यात आल्याने मुंबईच्या वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली आहे.

१४ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च असलेला कोस्टल रोड टप्प्याटप्प्याने सेवेत आणला जात आहे. या रस्त्याच्या  उत्तर वाहिनीवरून मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांत ३१ लाख ३३ हजार ५५९ वाहनांनी, तर दक्षिण वाहिनीवरून नऊ लाख २८,१३७ वाहनांनी प्रवास केला आहे. दक्षिण वाहिनी ११ जूनला सुरू करण्यात आली होती.  मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, करमुक्त वेगवान प्रवास करता येत असल्याने आणि इंधनाची बचत होत असल्याने मुंबईकर या प्रवासाला पसंती देत आहेत.    

कोणत्या महिन्यात किती?

महिना  दक्षिण वाहिनी   उत्तर वाहिनी

मार्च    २,६३,६१०       ०

एप्रिल   ४,३६,१५०       ०

मे      ५,२८,५१९       ०

जून    ७,४५,१५५       १,८१,५०९

जुलै    ५,४६,१८६       ३,३६,२१९

ऑगस्ट  ६,१३,९३९       ४,१०,४०९

एकूण   ३१,३३,५५९      ९,२८,१३७

गाड्यांची संख्या अशी...

३१,३३,५५९- दक्षिण वाहिनी

९,२८,१३७- उत्तर वाहिनी

कोस्टल रोडचे आत्तापर्यंतचे सुरू झालेले टप्पे

 ११ मार्च २०२४ : बिंदूमाधव ठाकरे चौक (वरळी) ते मरीन ड्राइव्ह.

 १० जून २०२४ : मरीन ड्राइव्ह ते हाजी अलीमार्गे लोटस जंक्शन.

 ११ जुलै २०२४ : हाजी अली ते वांद्रे-वरळी सागरी सेतूला जाण्यासाठी खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडणारी मार्गिका.

 १३ सप्टेंबर २०२४ : वांद्रे-वरळी सेतूला जोडणारा दक्षिण बाजूकडील पूल.