धनगर समाजाच्या आरक्षणासाठी विधानभवनाबाहेर आंदोलन
By admin | Published: March 15, 2017 12:30 PM2017-03-15T12:30:15+5:302017-03-15T12:30:15+5:30
धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी करत धनगर समाज आरक्षण समिती व यशवंत क्रांती मोर्चा संघटनेने आज विधानभवन येथे आंदोलन केले.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी करत धनगर समाज आरक्षण समिती व यशवंत क्रांती मोर्चा संघटनेने आज विधानभवन येथे आंदोलन केले. क्रिकेटर्सचे कपडे घालत आंदोलन करणाऱ्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले.
धनगर समाज आरक्षणावर टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) या संस्थेची केलेली नेमणूक त्वरित रद्द करावी, अशी मागणी धनगर समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे. पाटील म्हणाले की, धनगर समाजाच्या विकासासाठी आर्थिक बजेट 4 कोटी तातडीने मंजूर करावे. दरम्यान इतर मागण्यांसाठी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले.
यावेळी पोलिसांची व धनगर समाज बांधवांमध्ये बाचाबाची झाली. सर्व कार्यकर्त्यांना मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात पाटील यांच्यासोबत हरिश्चंद्र धायगुडे पाटील, विक्रम भोसले,समाधान बिछिरे,सुनिल महानोर,गणेश लोंढे या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.