Join us

सरकारच्या छळाविरोधात लालबागमधील दुकानदारांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 1:19 PM

लालबाग येथील जाम मिल बिल्डिंगमधील दुकानांना जास्त भाडे आकारून त्यांचे जिणे नकोसे केले आणि आता तर त्यांना हुसकावून लावण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

ठळक मुद्देशासनाकडून असाच त्रास सुरू राहिला तर शेतकर्यांप्रमाणे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे दुकानदारांनी बोलून दाखविले.

मुंबई : सरकारकडून दुकानांच्या भाड्यामध्ये दहापट वाढ करून दुकानदारांना हुसकावून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. लालबाग येथील जाम मिल बिल्डिंगमधील दुकानांना जास्त भाडे आकारून त्यांचे जिणे नकोसे केले आणि आता तर त्यांना हुसकावून लावण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. 

 

 

दुकानदारांनी योग्य भाडे देण्याचे कधीही नाकारले नव्हते, पण एन.टी.सी.ने भाडे स्वीकारणे बंद केले आणि दुकानदारांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. 31 मार्च 2018 ला दुकाने सील करण्यासाठी नोटीस दिली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या दुकानदारांनी सरकारच्या छळवादाकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी लालबाग येथे आंदोलन सुरु केले आहे. त्याचबरोबर लालबाग व्यापारी असोसिएशनने 30 मार्च 2018 रोजी लालबागमधील सगळी दुकाने बंद ठेवून जाम बिल्डिंगमधील दुकानादारांना पाठिंबा दर्शविला आहेत. शासनाकडून असाच त्रास सुरू राहिला तर शेतकर्यांप्रमाणे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे दुकानदारांनी बोलून दाखविले.

टॅग्स :मुंबई