Vidhan Parishad Election : भाजप चार जागा लढविणार असल्याने निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 06:00 AM2020-05-02T06:00:23+5:302020-05-02T06:01:16+5:30

भाजपने नऊपैकी चार जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुका बिनविरोध कशा होतील यासाठी पडद्याआड जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

Movements to hold elections unopposed as BJP will contest four seats | Vidhan Parishad Election : भाजप चार जागा लढविणार असल्याने निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली

Vidhan Parishad Election : भाजप चार जागा लढविणार असल्याने निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली

Next

अतुल कुलकर्णी 
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र भाजपने नऊपैकी चार जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुका बिनविरोध कशा होतील यासाठी पडद्याआड जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
२४ एप्रिल रोजी भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस २, शिवसेना १ अशा नऊ जागा रिक्त झाल्या होत्या. आता नव्या विधानसभेत संख्याबळदेखील बदलले आहे. भाजपचे स्मिता वाघ, अरुण अडसड व पृथ्वीराज देशमुख हे तीन सदस्य निवृत्त झाले होते. यापैकी कोणाला संधी मिळेल किंवा सगळी नावे नवीन येतील याविषयी लवकरच निर्णय होईल असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक २८.९ म्हणजेच २९ मतांची गरज आहे. याबद्दल विचारले असता ते म्हणाले, भाजपचे १०५ व मित्र पक्ष व अपक्ष मिळून आमचे ११५ सदस्य आहेत आणि २९ मतांचा कोटा आहे. त्यानुसार आमचे ४ उमेदवार निवडून येऊ शकतात. तर राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही तीनही पक्ष मिळून यावर निर्णय घेऊ. संख्याबळानुसार कोणाच्या किती जागा येतील हे पाहिले जाईल असेही ते म्हणाले. भाजपकडून एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी १६९ मते महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने पडली होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदी राष्टÑवादीचे नेते दिलीप वळसे पाटील होते. म्हणजे १७० मते सरकारच्या बाजूने होती. २९ मतांच्या हिशोबानुसार महाविकास आघाडीचे पाच सदस्य निवडून येऊ शकतात.
निवृत्त झालेले सदस्यांमध्ये विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोºहे यांचा समावेश होता. त्यामुळे शिवसेनेला त्यांचे निवडून येणे आवश्यक वाटते. त्यांना असे वाटणे हे तसे पाहायला गेल्यास स्वाभाविक आहे.
याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळा घाट घातला गेल्याने ते निवडून आलेच पाहिजेत, तरच सरकार टिकणार आहे, शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. त्यांना दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी २ मतांची गरज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, आनंद ठाकूर व किरण पावसकर हे ती सदस्य निवृत्त झाले. मात्र आता राष्टÑवादीकडे फक्त ५४ आमदार आहेत. त्यामुळे त्यांना दोन उमेदवार निवडृन येण्यासाठी ४ मतांची गरज आहे. त्यामुळे आहे त्या तीन पैकी कोणत्या दोघांना संधी मिळणार की नवीन चेहरे आणले जाणार याकडे लक्ष लागलेले आहे.
काँग्रेसचे हरिभाऊ राठोड निवृत्त झाले असून चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजीनामा दिला होता. काँग्रेसचे संख्याबळ ४४ आहे. त्यांना दोन आमदार निवडून आणण्यासाठी तब्बल १४ मतांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे. काँग्रेसमधून या निवडणुकीसाठी कोण उमेदवार म्हणून देण्यात येईल? याचा निर्णय दिल्लीतूनच घेण्यात येईल, असे राज्यातील नेत्यांचे म्हणणे आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करावी यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्यानुसार शिवसेना व राष्टÑवादीने प्रत्येकी दोन तर काँग्रेसने एक उमेदवार उभा करावा असे बोलले जात आहे. मात्र महाविकास आघाडीकडे अपक्ष व सहयोगी पक्ष मिळून १४ मते जास्त आहेत असे सांगण्यात येत आहे. यावर तीनही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीतच अंतिम निर्णय होईल असे समजते.
>पक्षीय बलाबल
भाजप - १०५, शिवसेना - ५६, राष्ट्रवादी काँग्रेस - ५४, काँग्रेस - ४४, बहुजन विकास आघाडी - ३, समाजवादी पार्टी - २, एम आय एम - २, प्रहार जनशक्ती - २, मनसे, माकप, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १ आणि अपक्ष - १३

Web Title: Movements to hold elections unopposed as BJP will contest four seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.