'शिवरायांवर वक्तव्य करणाऱ्यांचा राग का येत नाही?, छत्रपती उदयनराजे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 04:36 PM2022-11-28T16:36:36+5:302022-11-28T18:38:54+5:30

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे.

MP Chhatrapati Udayanraje Bhosale criticized Governor Bhagat Singh Koshyari | 'शिवरायांवर वक्तव्य करणाऱ्यांचा राग का येत नाही?, छत्रपती उदयनराजे संतापले

'शिवरायांवर वक्तव्य करणाऱ्यांचा राग का येत नाही?, छत्रपती उदयनराजे संतापले

googlenewsNext

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्रमक भूमिका घेतली.

गेल्या काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावरुन राज्यभरात शिवप्रेमींनी निषेध व्यक्त केला. तसेच माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनीही निषेध केला होता, आज भाजप खासदार उदयनराजे भासले यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली. 

"आज राज्यातील शिवप्रेमींशी चर्चा केली, सर्वांनी मुद्दे मांडले. महाराजांचे चित्रपटातून अवहेलना केली जाते, तेव्हा राग कसा येत नाही? तुम्ही महाराजांचे राजकारणासाठी नाव का घेता, असा सवाल खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला. लोकशाहीचा ढाचा महाराजांनी मांडला. जे महाराजांवर चुकीच बोलतात त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का होत नाही, असंही खासदार भोसले म्हणाले. 

"महाराजांनी सर्वांना एकत्र आणले होते, सगळ्या जातींना एकत्र राहण्यास शिकवले होते. महाराजांबद्दल सध्या होत असलेल्या राजकारणामुळे लोक चिडले आहेत. त्यामुळे ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता रायगडावर जाऊन प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार" असल्याचे खासदार उदयनराजे भासले म्हणाले. 

"शिवाजी महाराजांबद्दल कोण वादग्रस्त बोलत असेलतर तुम्ही काही कारवाई करत नसाल तर तुम्हाला महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.आज ज्यांनी निषेध केला त्यांनी शिवप्रेमी म्हणून निषेध केला, कोणत्याही पक्षाचा यात संबंध नाही.   

Bhagat Singh Koshyari: “महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसतेय,” कोश्यारींच्या पदमुक्तीच्या चर्चेवर राऊतांचा हल्लाबोल
   
 "राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची मी या संदर्भात भेट घेणार आहे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. त्यांनी कारवाई केली नाही तरीही मी माझी भूमिका बदलणार नाही, असंही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. 

Web Title: MP Chhatrapati Udayanraje Bhosale criticized Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.