संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांचा उत्तर मुंबईच्या विविध संस्थांनी केला सत्कार

By मनोहर कुंभेजकर | Published: April 9, 2023 03:19 PM2023-04-09T15:19:04+5:302023-04-09T15:20:32+5:30

यावेळी त्यांच्या कार्याची महती सांगणारी चित्रफीत दाखवण्यात आली.

mp gopal shetty who received sansad ratna award was felicitated by various organizations of north mumbai | संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांचा उत्तर मुंबईच्या विविध संस्थांनी केला सत्कार

संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांचा उत्तर मुंबईच्या विविध संस्थांनी केला सत्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई-संसदेतील उकृष्ट कामगिरीची पोचपावती म्हणून संसद रत्न पुरस्कार मिळाल्या बद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांचा उत्तर मुंबईतील पोईसर जिमखाना व उत्तर मुंबईचे क्रीडा,हाऊसिंग सोसायटी,सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी त्यांचा मानपत्र, सन्मान चिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. काल सायंकाळी कांदिवली पश्चिम येथील पोईसर जिमखान्याच्या मैदानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात त्यांना तिसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच त्यांच्या पत्नी उषा शेट्टी व शेट्टी कुटुंबाला देखिल गौरवण्यात आले.

यावेळी मुख्य अतिथी म्हणून गोरेगाव स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष व शिक्षण तज्ञ डॉ.विनय जैन, मंडपेश्वर सिविक फाउंडेशन क्लब अध्यक्ष सीए निहार जम्बूसरिया,तसेच जेष्ठ नेते अँड.जे.पी.मिश्रा, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर,पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी,उपाध्यक्ष  करूणाकर शेट्टी,इस्कॉनचे कृष्णभजनदास आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांच्या कार्याची महती सांगणारी चित्रफीत दाखवण्यात आली.

यावेळी डॉ.विनय जैन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कार्याचा गौरव करतांना म्हणाले की, ते आमच्या साठी प्रेरणा स्थान असून त्यांनी मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला.गार्डन सम्राट म्हणून त्यांची मुंबईत ओळख आहे.उत्तर मुंबईत ओपन स्पेसचा त्यांनी विकास केला.शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करून त्यांची 30 मीटर उंची  45 मीटर पर्यंत वाढवण्यासाठी त्यांनी आवाज उठवला.झोडपट्टीतून त्यांनी आपला प्रवास सुरु करुन संसदे पर्यंत त्यांचा प्रवास उत्तर मुंबईसाठी गौरव पूर्ण बाब आहे.

सीए निहार जम्बूसरिया म्हणाले की, ते ऑफिसमध्ये छोट्या पासून मोठ्यां पर्यत ते सर्वांना भेटतात.मुलींचे विवाह वय 18 एवजी 21 करावे हे खाजगी विधेयक त्यांनी संसदेत मांडले.त्यांनी आरोग्य,क्रीडा,महिला सक्षमीकरण, पर्यावरण,कुशल प्रशासक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अँड.जे.पी.मिश्रा म्हणाले की,संसद रत्न पुरस्कार मिळणे उत्तर मुंबईसाठी गौरवाची गोष्ट असून उत्तर मुंबई जनेतची सेवा केल्याबद्धल त्यांना संसद पुरस्कार देवून तिसऱ्यांदा त्यांचा गौरव केला.झोपडपट्टीवर झालेल्या अन्याया विरोधात ते रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन करतात अशी अनेक उदाहरणे आहे. विशेष म्हणजे लोकसभा  निवडणूकीत उरलेला निवडणूक निधी तब्बल 2.5 कोटी त्यांनी पार्टीला परत केला.

इस्कॉनचे कृष्णभजनदास म्हणाले की,पाठशाळां मध्ये भगवंत गीता शिकवण्यासाठी त्यांनी संसदेत आवाज उठवला.त्यांच्या मुळे गेली 12 महिने पोईसर जिमखान्यात दर शनिवारी  भगवत गीता आम्ही शिकवतो.उत्तर मुंबईच्या सर्व युवकांसाठी भगवत गीता शिकवली जाण्यासाठी ते पुढाकार घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देतांना खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, 1992 साली नगरसेवक पदाची निवडणूक 454 मतांनी जिंकलो.मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे विजयी मार्जिन वाढतच गेले.गेल्या लोकसभा 4.5 लाख तर गेल्या लोकसभा निवडणुकीत 4,74000 मतांनी जिंकलो. कोरा केंद्र सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे , प्रमोद महाजन क्रीडांगणाचा विकास करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव उभारणे,चिकू वाडी जंक्शनचा प्लॉट विकास करणार.मालाड पश्चिम 20 एकर जागेचा विकास करणे,आरोग्य व शिक्षणा साठी काम करणे यांना प्राधान्य देणार आहे.तसेच आगामी काळात व्यवसाय करून येणारा पैसा जनतेसाठी उपयोगात आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: mp gopal shetty who received sansad ratna award was felicitated by various organizations of north mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.