उत्तर मुंबईत खासदार गोपाळ शेट्टी यांचा ५००० वृक्षारोपणाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:08+5:302021-07-05T04:06:08+5:30
उत्तर मुंबईत खासदार गोपाळ शेट्टी यांचा ५००० वृक्षारोपणाचा संकल्प मुंबई - उत्तर मुंबईत ५९०० पिशव्या रक्तसंकलन करण्याचा विक्रम अलीकडेच ...
उत्तर मुंबईत खासदार गोपाळ शेट्टी यांचा ५००० वृक्षारोपणाचा संकल्प
मुंबई - उत्तर मुंबईत ५९०० पिशव्या रक्तसंकलन करण्याचा विक्रम अलीकडेच करणाऱ्या उत्तर मुंबईचे
भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला होता. तर आता संपूर्ण उत्तर मुंबईत ५००० वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. आज एका दिवसात उत्तर मुंबईत २५०० झाडे लावण्यात आली.
बोरिवली पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाच्या वतीने येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात
आज वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या अभियानात आज बोरिवलीतील १०० सामाजिक संस्था सहभागी झाल्या. एकाच दिवशी १०० संस्थांनी आपल्या संस्थेच्या आवारात वृक्षारोपण केले. तर दि, २ जुलैपासून स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित लोकमतच्या रक्तदानाच्या महायज्ञात आपण सहभागी होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
या अभियानात सर्व संस्थांना स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात वृक्ष वितरण केले गेले. सर्व संस्थांचे पदाधिकारी या समारंभास उपस्थित राहून झाडांचा स्वीकार केला. सर्व पदाधिकाऱ्यांचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वृक्ष देऊन सन्मान केला व त्वरित आजच्या आजच वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
या समारंभास भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, महासचिव दिलीप पंडित, बोरिवलीतील सर्व नगरसेवक उपस्थित होते. उद्यान समितीचे पदाधिकारी अजय राजपुरोहित यांनी सूत्रसंचालन करताना या अभियानाबद्दल खासदारांचे अभिनंदन केले. तसेच सचिव अमोल सुत्राळे, नितीन प्रधान, अमित व्यास यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केलेल्या श्रमासाठी तसेच सर्व स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.
-------------------------------------------