Join us

खासदार हेमा मालिनी राज्यपालांना भेटल्या, मास्क न बांधताच केली 'कोरोना पे चर्चा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 8:20 PM

कोरोनाच्या महामारीमुळे देशात लॉकडाऊन असून नागरिकांना सोशल डिस्टन्स आणि मास्कच्या वापराचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे, गाव-खेड्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वचजण मास्कचा वापर करताना दिसत आहेत.

मुंबई - भाजपा नेत्या आणि उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार हेमा मालिनी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या याबाबत चर्चा केली. तसेच, स्थलांतरीत कामगारांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. मुंबईत अडकलेल्या आणि उत्तर प्रदेशात जाऊ इच्छिणाऱ्या मजूरांच्या सुरक्षेसाठी कोश्यारी यांच्याशी संवाद साधला. मात्र, यावेळी हेमा मालिनी आणि राज्यपाल कोश्यारी यांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेले नव्हते. त्यामुळे, नेटीझन्सने प्रश्न उपस्थित केले आहेत. 

कोरोनाच्या महामारीमुळे देशात लॉकडाऊन असून नागरिकांना सोशल डिस्टन्स आणि मास्कच्या वापराचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे, गाव-खेड्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वचजण मास्कचा वापर करताना दिसत आहेत. मात्र, राज्याचे राज्यपाल यांना भेटण्यासाठी ड्रिमगर्ल खासदार हेमा मालिनी आल्या होत्या. त्यावेळी, त्यांनी तोंडाला मास्क लावले नसल्याचे दिसून आले. राज्यापाल कोश्यारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर फोटो काढताना, दोन्ही जबाबदार नेत्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावल्याचे दिसून आले नाही. हेमा मालिनी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर, ट्विटर युजर्संने हेमा मालिनी यांना मास्क का घातले नाही, असा सवाल केला. 

मुंबईत अडकलेल्या मथुरेतील नागरिकांना त्यांच्या गावी, इच्छित स्थळी पोहोचविण्यासंदर्भात चर्चा केली. त्यास, महाराष्ट्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे हेमा मालिनी यांनी म्हटंलय. मात्र, हेमा मालिनी यांनी राज्यपाल महोदयांसोबत फोटो काढताना, सोशल डिस्टन्स आणि मास्क न वापरुन लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे.   

टॅग्स :मुंबईहेमा मालिनीसरकारभगत सिंह कोश्यारी