खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:09 AM2021-02-23T04:09:06+5:302021-02-23T04:09:06+5:30

सुसाईट नोटमध्ये बड्या अधिकाऱ्यांची नावे ? खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या सुसाईड नोटमध्ये बड्या अधिकाऱ्यांची नावे ? लोकमत न्यूज ...

MP Mohan Delkar commits suicide | खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या

खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या

Next

सुसाईट नोटमध्ये बड्या अधिकाऱ्यांची नावे ?

खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या

सुसाईड नोटमध्ये बड्या अधिकाऱ्यांची नावे ?

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (वय ५९) यांनी मरिन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साऊथ हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून, त्यात गुजरातच्या काही अधिकाऱ्यांची नावे लिहिली असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

डेलकर हे सी ग्रीन साऊथ हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील रूममध्ये थांबले होते. रविवारी रात्री ते हॉटेलमध्ये आले. सकाळी ११ वाजता त्यांच्या चालकाने फोन केला. मात्र, तो त्यांनी उचलला नाही. बरेच कॉल केल्यानंतरही त्यांनी ते न उचलल्याने चालकाने याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनीही त्यांंना फाेन केले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही कॉल केले. मात्र, काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर रूमच्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दरवाजा उघडला नाही. दुपारी १२ च्या सुमारास याबाबत हॉटेलकडून पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार, मरिन ड्राइव्ह पोलीस तेथे दाखल झाले. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, डेलकर यांच्या चालकाने बाजूच्या विंगमधील पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून त्यांच्या गॅलरीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. यात तो खाली कोसळणार होता. हे त्याच्या जिवावर बेतले असते. मात्र, मालकाकडे जाण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. अखेर तो गॅलरीत उडी घेण्यात यशस्वी झाला. त्यावेळी डेलकर हे शालच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या मृतदेहाशेजारी गुजराती भाषेत लिहिलेली सुसाईड नोट सापडली. या नोटमध्ये गुजरातच्या काही बड्या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

डेलकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. डेलकर हे सातवेळा खासदार हाेते. तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज असून, सुसाईड नोटच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

........................................

.....

Web Title: MP Mohan Delkar commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.