गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ दिला आहे, तर दुसरीकडे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. दरम्यान, आता लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. राज्यातील खासदारांनी केंद्र सरकारला आरक्षणाची टक्केवारी वाढवून देण्याची मागणी सुरू केली असून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही हीच मागणी केली आहे.
सगळेच मराठा कुणबी होणार, क्युरेटिव्ह पिटीशनची गरज वाटत नाही; छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात गेल्यापासून मी लोकसभेत आरक्षणाचा कोटा वाढवून देण्याची मागणी करत आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांचा आकडा वाढवायचा असेलतर त्याचा अधिकार संसदेला आहे. राज्यातही भाजपचे आणि केंद्रातही भाजपचे सरकार आहे. मराठा समाज ग्रामीण भागात राहणारा आहे. लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे, आपली ताकद वापरून ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवायला पाहिजे, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली.
"आरक्षणाच्या प्रश्नात राजकारण करण्यापेक्षा ही पाऊले उचलणे गरजेचे आहे. जी वस्तुस्थिती आहे, राज्य सरकारच्या अनेकवेळा हीच गोष्ट लक्षात आणून दिली आहे. केंद्रात ५० टक्क्याचा प्रश्न मार्ग लावला तर सगळेच प्रश्न मिटतील. भाजपने जर मनात आणले तर हा प्रश्न मिटवतील, त्यांचेच सरकार आहे. आरक्षणामध्ये अडचणी काय आहे त्यावर काम करायला पाहिजे, संविधानिक दुरुस्ती करुन आरक्षणाची मर्यादा वाढवणे हाच यावर मार्ग आहे, असे ते म्हणाले.
सगळेच मराठा कुणबी होणार, क्युरेटिव्ह पिटीशनची गरज वाटत नाही
"आता मागासवर्गीय आयोग राहिला नाही, तो आता मराठा आयोग झाला आहे. सगळेच आता कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत. त्यामुळे राज्यात मराठा शिल्लक राहणार नाहीत,'असं सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. सगळेच आता ओबीसीमध्ये येत आहेत, बाहेर कोण राहणार आहे, आयोगातून आता अनेकांनी राजीनामे दिले आहेत.
मनोज जरांगे यांच्या टीकंवर बोलताना भुजबळ म्हणाले, माझ्यावर टीका केली नाही तर त्यांचे भाषण कोण ऐकणार, असा टोलाही त्यांनी नाव न घेता लगावला.
मनोज जरांगेंच्या विधानाने संभ्रम!
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजू शकतो, असे सांगितले जात आहे. यातच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या विधानावर मनोज जरांगे यांनी स्पष्टीकरण देत, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका, असे आवाहन केले आहे.