Join us

रियाला AU नावाने कॉल आले होते; आदित्य, उद्धव तर नाही ना? सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी राहुल शेवाळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 8:05 PM

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज लोकसभेत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या मृत्यूचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज लोकसभेत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या मृत्यूचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.सुशांतसिंह रजपूर यांच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला AU नावाने 44 कॉल आले होते. AU म्हणजे आदित्य आणि उद्धव आहेत का? असा प्रश्न लोकसभेत खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित केला. लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

राहुल शेवाळे लोकसभेत म्हणाले, 'रिया चक्रवर्तीच्या फोन कॉल्सची चौकशी झाली का? ती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकारण्यांशी संपर्कात होती, त्यांच्याशी मैत्री होती, हे बरोबर आहे का?, असंही ते म्हणाले. 

Sanjay Raut News: मोठी घडामोड! संजय राऊतांचा निकटवर्तीय शिंदेंनी फोडला?; रात्री ९.३० वाजता प्रवेश करणार

लोकसभेतून बाहेर पडताना शेवाळे यांनी पत्रकार परिषदेतही या प्रकरणाचा पुनरुच्चार केला. 'सुशांत सिंह रजपूतच्या मृत्यूशी संबंधित सत्य अद्याप लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. त्यांची उत्तरे त्यांना मिळायला हवीत. एनसीबीने रिया चक्रवर्तीची चौकशी केली. ड्रग्जच्या प्रकरणाबाबत चौकशी करण्यात आली. बिहार पोलीस आणि नंतर सीबीआयनेही या प्रकरणाचा तपास केला. बिहार पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला AUच्या नावाने 44 वेळा कॉल आले होते, असंही राहुल शेवाळे म्हणाले. 

'रिया चक्रवर्तीच्या कायदेशीर टीमने AU चा अर्थ 'अनन्या उद्धव' असा समजावून सांगितला. याबाबत मुंबई पोलिसांनी अधिक खुलासा केलेला नाही. पण बिहार पोलिसांच्या तपासात AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा सांगितला आहे. सीबीआयने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य काय, ते बाहेर यावे. असे आवाहन मी केंद्रीय गृहमंत्र्यांना केले आहे, असंही राहुल शेवाळे म्हणाले.

आदित्यची तेजस्वी यादव यांच्याशी भेट झाल्यानंतरही शेवाळे यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर होते. आदित्य ठाकरे पाटण्यात तेजस्वी यादव यांना का भेटले? त्याचे रहस्य उघड व्हावे. याची चौकशी झाली पाहिजे, असंही राहुल शेवाळे म्हणाले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाउद्धव ठाकरेराहुल शेवाळे