राजू शेट्टींकडे किती एकर जमीन आहे माहित्येय का?... ऐका त्यांच्याचकडून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 06:38 PM2019-02-12T18:38:12+5:302019-02-12T18:42:37+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा नेता म्हणून राजू शेट्टी यांची ओळख आहे. त्यामुळेच, राजू शेट्टी हतकणंगले मतदारसंघातून खासदार बनून निवडूण येतात.
मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा खुलासा केला. तुमच्याबद्दल सर्वात जास्त ऐकलेली अफवा कोणती ? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी एका कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावेळी बोलताना राजू शेट्टींनी उत्तर दिले, मी प्रचंड प्रमाणात जमिनी घेतल्यात ही मी ऐकलेली सर्वात मोठी अफवा असल्याच राजू शेट्टींनी म्हटलं. तर मला दीड एकर जमिन असल्याचंही त्यांनी सांगितलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा नेता म्हणून राजू शेट्टी यांची ओळख आहे. त्यामुळेच, राजू शेट्टी हतकणंगले मतदारसंघातून खासदार बनून निवडूण येतात. एका कार्यक्रमात राजू शेट्टींना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी, त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर शेट्टींनी मनमोकळपणे उत्तरं दिली. मुंबई की दिल्ली असं विचारलं असता, शेतकऱ्यांसदर्भातील धोरणं दिल्लीत ठरतात. त्यामुळं, मला दिल्लीत राहायला आवडतं, असे त्यांनी म्हटले. तर मी कुणालाही घाबरत नाही, कुणाचाही फोन घ्यायला घाबरत नाही, माझ्या बायकोचासुद्धा नाही, असे बिनधास्तपणे उत्तर राजू शेट्टींनी दिले.
मी प्रचंड जमिनी घेतल्या आहेत, अशी माझ्याबद्दल मोठी अफवा आहे. पण, माझ्याकडे दीड एकर जमिन आहे. मात्र, कधी कधी हे ऐकून बरंही वाटतं. कारण, मी शाहू महाराजांपेक्षाही श्रीमंत झाल्याचा आनंद वाटतो, असे राजू शेट्टींनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले. तसेच या कार्यक्रमात एका प्रश्नावर उत्तर देताना, मी सदाभाऊ खोत हे भामटा तर देवेंद्र फडणवीस बोगस असल्याचं म्हटलं. तसेच शरद पवार हे अविश्वासू माणूस असल्याचेही राजू शेट्टींनी जाहीरपणे सांगितले.