मुंबई- आज चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले. चारपैकी तीन राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यात भाजपने मोठी कामगीरी केली. राजस्थान आणि छत्तीगड या राज्यात भाजपची सत्तांतराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत यांनीही काँग्रेसच्या पराभवामागचे कारण सांगितलं आहे.
पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी काँग्रेसच्या पराभवामागचे कारण आणि काँग्रेसला सल्लाही दिली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, यापुढे काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी त्यांच्या पक्षात आणि इंडिया आघाडीतील समन्वयाच्याबाबतीत देशभरात नव्याने विचार करण्याची गरज आली आहे. काहीही झालं तरीही इंडिया आघाडी मजबूर राहिलं, मध्य प्रदेशमध्ये इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढली असती, आपल्या काही सहकाऱ्यांना जर काँग्रेसने मदत केली असती तर आज काँग्रेसची कामगीरी आजपेक्षा चांगली राहिली असती, असं माझ स्पष्ट मत आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
भाजपच्या विजयाने अजित पवार भलतेच खूश; इंडिया आघाडीला लगावला खोचक टोला
"मध्य प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या पक्षाला काही भागामध्ये चांगले स्थान आहे आणि त्यांची काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छा होती. दहा ते बारा जागा एकत्र लढण्याची त्यांची इच्छा होती, पण कमलनाथ यांनी ही युती होऊ दिली नाही. इंडिया आघाडी म्हणून एकत्र निवडणूका लढायला हव्यात हा धडा आपण यातून घेतला पाहिजे, प्रादेशिक पक्षांना डावलून राजकारण करता येणार नाही, असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला.