'बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला'; राऊतांनी भारतरत्नवरुन भाजपला डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 06:35 PM2024-02-09T18:35:36+5:302024-02-09T18:35:55+5:30

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

MP Sanjay Raut criticized BJP on Bharat Ratna award | 'बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला'; राऊतांनी भारतरत्नवरुन भाजपला डिवचले

'बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला'; राऊतांनी भारतरत्नवरुन भाजपला डिवचले

Sanjay Raut ( Marathi News ) : मुंबई- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर भारतरत्न पुरस्कारांची घोषणा झाली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता भारतरत्न पुरस्कारावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. 

खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन भाजपवर टीका केली आहे. "हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले. आधी 2 आणि आता एकदम 3 असे एका महिन्यात 5 नेत्यांना भारतरत्न ने सन्मानित करण्यात आले. पण त्यात ना वीर सावरकर ना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

...तर बाळासाहेबांनाही भारतरत्न घोषित करा, राज ठाकरेंची मागणी; कारणही सांगितलं!

"खरं तर नियम असा आहे की एका वर्षात जास्तीत जास्त 3 भारतरत्न देता येतात. मोदी यांनी एका महिन्यात 5 जणांना भारत रत्न जाहीर केले. निवडणुकांची धामधूम. दुसरे काय? कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवानी यांच्या मागोमाग आता चौधरी चरण सिंग.पी वी नरसिंहराव आणि एम एस स्वामिनाथन यांना भाररत्न ने सन्मानित केले. आणखी काही नेते प्रतीक्षेत आहेत, असंही राऊत म्हणाले.

" मा.बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला...ज्यांच्यामुळे मोदी अयोध्येत राममंदिर सोहोळा करू शकले, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना भरतरत्नची केली मागणी

 पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

Web Title: MP Sanjay Raut criticized BJP on Bharat Ratna award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.