' छत्रपतींना पाच दिवस वेटींगला ठेवलं, उदयनराजेंनी विचार करायला हवा; संजय राऊत थेटच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 03:37 PM2024-03-24T15:37:25+5:302024-03-24T15:45:21+5:30
Sanjay Raut : उमेदवारीसाठी छत्रपती उदयनराजे भोसले गेल्या पाच दिवसापासून दिल्लीत असल्याचे बोलले जात आहे, यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.
Sanjay Raut ( Marathi News ) : मुंबई- राज्यात सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकांची जोरादार तयारी सुरू केली आहे. भाजपने राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २० उमेदवारांची नावे आहेत. भाजपची आणखी एक यादी काहीच दिवसात जाहीर होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. भाजपकडे उमेदवारीची मागणीही उदयनराजेंनी केली आहे. उमेदवारीसाठी छत्रपती उदयनराजे भोसले गेल्या पाच दिवसापासून दिल्लीत असल्याचे बोलले जात आहे, यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली असून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विचार करायला हवा, असंही म्हटले आहे.
विजय शिवतारेंनी घेतला फायनल निर्णय: १२ तारखेला फॉर्म भरणार, निवडणुकीचं सर्व प्लॅनिंग सांगितलं!
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली. "महाविकास आघाडीने कोल्हापुरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना अत्यंत सन्मानाने आणि एकमताने उमेदवारी दिली. आम्ही एकत्रित विचार केला, ती जागा शिवसेनेची होती. कोल्हापुरला शिवसेना प्रत्येकवेळी लढते, लाखो मत घेते. कधी जिंकली, कधी हरली. पण जेव्हा ठरलं की, शाहू महाराजांना आपण लढवायला हवं आणि महाराष्ट्राला संदेश द्यायला हवा. तेव्हा आम्ही क्षणाचाही विचार न करता आम्ही छत्रपतींसाठी ही जागा दिली, त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढवायचं ठरवलं आहे. दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरात जाऊन छत्रपती शाहू महाराजांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या हा सन्मानाचा भाग झाला, असंही संजय राऊत म्हणाले.
'छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विचार करायला हवा'
संजय राऊत म्हणाले, "साताऱ्यात छत्रपती शिवरायांची गादी आहे. भाजपला जर शिवरायांच्या गादीचा मान राखता येत नसेल तर किंवा त्यांना अपमानित केलं जात असेल मग उदयनराजे असतील किंवा अन्य त्यांचे वारसदार असतील तर त्यांनी समाजाला सांगावं लागेल. मागे जेव्हा आमच्याकडून काही या विषयावर डिबेट झालं होतं, तेव्हा आम्ही गादीचा अपमान केला अस म्हणणारे हेच होते. पण उदयनराजे भोसले यांना पाच, पाच दिवस वेटींगला ठेवता, खर म्हणजे उदयनराजे यांनी याचा विचार करायला हवा. ते त्या पक्षाचे सदस्य आहेत.